फक्त एक गोळी चालवून दाखवा आणि परिणाम भोगा, ईराणची अमेरिकेला धमकी

अमेरिकेने ईराणवर मिलिट्री कारवाई करण्याची तयारी केल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ईराणनेही अमेरिकेला सडेतोड शब्दात उत्तर दिलंय.

फक्त एक गोळी चालवून दाखवा आणि परिणाम भोगा, ईराणची अमेरिकेला धमकी

तेहरान : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर ईराणनेही पलटवार केलाय. अमेरिकेने आमच्यावर एकही गोळी चालवली, तर त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ईराणने दिलाय. अमेरिकेने ईराणवर मिलिट्री कारवाई करण्याची तयारी केल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ईराणनेही अमेरिकेला सडेतोड शब्दात उत्तर दिलंय. ईराणवर एकही गोळी चालवल्यास अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांना परिणाम भोगावे लागतील, अशी प्रतिक्रिया मध्य पूर्वमध्ये सशस्त्र बलाचे जनरल स्टाफचे प्रवक्त ब्रिगेडियर जनरल अबोफजल शकरची यांनी दिली.

“इस्लामिक गणराज्य कधीही स्वतःहून युद्ध पुकारत नाही, किंवा कधी युद्धाची सुरुवातही करत नाही. पण शत्रूने थोडीही चूक केली तर त्यांना मध्य आणि पश्चिम आशियात ईराणच्या सर्वात मोठ्या क्रांतीकारी प्रतिक्रियेचा सामना करावा लागेल. निश्चितपणे ते युद्धापासून वाचू शकणार नाहीत. शत्रूने एकही गोळी चालवली, तर त्याचं आम्ही तसंच उत्तर देऊ,” असं शकरची म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनीही धमकी दिली होती. अमेरिकेने ईराणवर मिलिट्री कारवाईची तयारी केली होती, पण त्यामध्ये 150 पेक्षा जास्त लोकांचा जीव जाणार होता, त्यामुळे कारवाईच्या 10 मिनिट अगोदर निर्णय मागे घेतला, असं ट्रम्प म्हणाले होते. ईराणने अमेरिकेचं सर्वात शक्तीशाली ड्रोन पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय.

ड्रोन पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ईराण आणि अमेरिका यांचे संबंध अगोदरच बिघडलेले आहेत. ईराणकडून तेल निर्यात थांबण्याची शक्यता पाहता कच्च्या तेलाच्या किंमतीही एका टक्क्याने वाढल्या आहेत. तेलाच्या किंमती वाढल्यास याचा परिणाम भारतावरही होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *