श्रीलंकेनंतर इराकमध्येही राष्ट्रपती भवन लोकांनी ताब्यात घेतलं! 15 ठार, बगदादमध्ये कर्फ्यू

Iraq Political Crisis : बगदाद येथील रिपब्लिकन पॅलसवर लोकांनी हल्लाबोल केलाय. हे पॅलेसच लोकांनी आपल्या ताब्यात घेतलंय. या पॅलेसमधील वस्तू्ंवर लोकं आपला मालकी हक्क असल्यासारखा दावा करत आहेत. या पॅलेसमध्ये लोकांनी घातलेला धुडसूस, त्याचे फोटो व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहेत.

श्रीलंकेनंतर इराकमध्येही राष्ट्रपती भवन लोकांनी ताब्यात घेतलं! 15 ठार, बगदादमध्ये कर्फ्यू
इराकमध्ये गोंधळ..Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 10:43 AM

जे श्रीलंकेत (Sri Lanka Crisis) झालं, तेच इराकमध्ये (Iraq Politics) होताना पाहायला मिळातंय. इराकमधील राष्ट्रपती भवन लोकांनी ताब्यात घेतलंय. त्यानंतर इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये (Bagdad) कर्फ्यू लावण्याची वेळ ओढावलीय. श्रीलंकेत दोन महिन्यांपूर्वी मोठ्या आर्थिक संकटानंतर राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. श्रीलंकेत हजारो आंदोलनकांनी कोलंबोतील राष्ट्रपती भवनच आपल्या ताब्यात घेतलं होतं. आता नेमकं इराकमध्येही तसंच कशामुळे होतं आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इराकमध्ये अनेकांना प्रभावित करणारे शिया मुस्लिम धर्मगुरु मुक्तदा अल सदर यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर इराकमध्ये एकच खळबळ उडाली. लोक रस्त्यावर उतरली. तीव्र आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आलं. यावेळी मुक्तदा अल सदर यांचे समर्थक आणि विरोध यांच्यात जोरदार झटापटही झाली. या हिंसक झटापटीत काही लोकांना जीवदेखील गमावावा लागलाय.

बगदाद येथील रिपब्लिकन पॅलसवर लोकांनी हल्लाबोल केलाय. हे पॅलेसच लोकांनी आपल्या ताब्यात घेतलंय. या पॅलेसमधील वस्तू्ंवर लोकं आपला मालकी हक्क असल्यासारखा दावा करत आहेत. या पॅलेसमध्ये लोकांनी घातलेला धुडसूस, त्याचे फोटो व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहेत. काही आठवड्यांपूर्वी नेमकं असच चित्र हे कोलंबोत दिसलं होतं. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांना हटवण्याची जोरदार मागणी श्रीलंकन जनतेनं केली होती. त्यावेळी मोठा जनतेच्या संतापाचा प्रचंड मोठा उद्रेक श्रीलंकेत पाहायला मिळाला होता.

थोडक्यात पण महत्त्वाचं

  • इराकमधील परिस्थिती चिघळतेय. त्यामुळे कुवैत मध्ये असलेल्या दुतावासातील नागरिकांना इराक तातडीने सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
  • इराकमध्ये ज्यांचा एक खूप मोठा अनुयायी वर्ग आहे, असे शिया धर्मगुरु मुक्तदा अल सदर यांनी सोमवारी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सदर यांच्या निर्णयाने नाराज झालेले शेकडो समर्थक, अनुयायी रस्त्यावर उतरलरे. त्यांनी सरकारी हवेली घुसून गोंधळ घातला.
  • सरकारी हवेलीत शिरत असताना सुरक्षा रक्षकांसोबत जोरदार झटापट झाली. या झटापटीत 20 जण मारले गेले असून आतापर्यंत कित्येक जण जखमी झाले आहेत.
  • परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी इराकमधील सैन्य दलाने कर्फ्यू लागू केलाय. लोकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.
  • येत्या काळात इराकमध्ये स्थिती आणखी चिघळेल, अशी शक्यता वर्तवली जातेय. इराकमध्ये राजकीय भूकंप येण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
  • सदर यांच्या पार्टीने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या होत्या. पण तरिही ते बहुमताचा आकडा गाठू शकले नव्हते. तेव्हापासून सामजस्याने सरकार बनवण्यात अडचणी येत होत्या. अखेर आता सदर यांनीच राजकारण कायमचं सोडण्याचा निर्णय जाहीर करुन टाकलाय.
Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.