जिओनीच्या मालकाने जुगारात हरलेली रक्कम मोजता येणार नाही!

बीजिंग (चीन): एखादा माणूस जुगारात किती रक्कम हरु शकतो? आपण एखादा अंदाज लावू शकतो. मात्रचीनची स्मार्टफोन कंपनी जिओनीच्या मालकाने जुगारात गमावलेली रक्कम आपल्याला मोजताही येणार नाही. लियू लिरॉन  यांनी थोडी थोडकी नाही तर तब्बल 10 हजार कोटी रुपये जुगारात गमावले. मालकाच्या या सवईमुळे जिओनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. चीनची स्मार्टफोन कंपनी जिओनीवर सध्या वाईट दिवस आले आहेत. कंपनी …

जिओनीच्या मालकाने जुगारात हरलेली रक्कम मोजता येणार नाही!

बीजिंग (चीन): एखादा माणूस जुगारात किती रक्कम हरु शकतो? आपण एखादा अंदाज लावू शकतो. मात्रचीनची स्मार्टफोन कंपनी जिओनीच्या मालकाने जुगारात गमावलेली रक्कम आपल्याला मोजताही येणार नाही. लियू लिरॉन  यांनी थोडी थोडकी नाही तर तब्बल 10 हजार कोटी रुपये जुगारात गमावले. मालकाच्या या सवईमुळे जिओनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

चीनची स्मार्टफोन कंपनी जिओनीवर सध्या वाईट दिवस आले आहेत. कंपनी सध्या आर्थिक परिस्थितीला तोंड देत आहे. एकीकडे कंपनी कठीण काळातून जात असताना, कंपनीचे मालक लियू लिरॉन यांचा जुगाराचा नाद काही केल्या कमी होत नाही. त्याचाही फटका कंपनीला बसला आहे. जिओनी कंपनीचे चेअरमन लियू लिरॉन (Liu Liron) यांनी जवळपास 10 हजार कोटी रुपये जुगारात हरले आहेत. त्यामुळे कंपनीचा पाय आणखी खोलात गेला आहे.

चीनची वेबसाईट Jiemian ने दिलेल्या माहितीनुसार, जिओनीचे चेअरमन लियू लिरॉन (Liu Liron) यांच्या जुगाराच्या सवयीमुळे कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. लिरॉनच्या या सवयीमुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. Jiemian ने आपल्या वेबसाईटवर म्हटलंय की, लियू लिरॉन साईपॅनच्या एका कसिनोमध्ये जुगार खेळताना 10 अरब युआन (अंदाजे 100 अब्ज रुपये) हरले. यामुळे जिओनी आपल्या पुरवठादारांना पेमेंटही करु शकत नाही. Jiemian वेबसाईटनुसार अंदाजे 20 पुरवठादारांना 20 नोव्हेंबरला शेनजेन इंटमीडिएट पीपल्स कोर्टमध्ये दिवाळखोरीचे निवेदन दिलं आहे.

जिओनी भारतात यावर्षी 6.5 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती, एप्रिलमध्ये देण्यात आली होती.  जिओनीला भारतातील टॉप 5 स्मार्टफोनच्या ब्रँड्समध्ये समावेश करायचा आहे. जिओनीने याच वर्षी एप्रिलमध्ये Gionee F205 आणि Gionee S11 Lite सोबत भारतीय बाजारपेठेत रिएंट्री केली. हे दोन्ही फोन सेल्फी प्रेमींसाठी लाँच करण्यात आले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *