वॉशिंग्टनः अमेरिकेसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जो बायडेन यांनी आज अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलीय. म्हणजेच आज अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झालीय. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलीय. शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये होत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या समारंभास उपस्थित आहेत. समारंभाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, हा सोहळा अमेरिकेत आयोजित करण्यात आलाय. अमेरिकेच्या राजधानीतील व्हाईट हाऊसमध्ये सुमारे 35 हजार राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आलेत. (Joe Biden Inauguration Us President Live Streaming India Time Vice President Kamala Harris Oath Ceremony Watch Online Today)
डेमोक्रेटिक पक्षाचे सर्व दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.
#WATCH | US: Vice President-elect Kamala Harris and her husband Doug Emhoff greet attendees of the inauguration ceremony at the US Capitol. pic.twitter.com/byNRr29I4F
— ANI (@ANI) January 20, 2021
ही चार वर्षे आश्चर्यकारक होतीः डोनाल्ड ट्रम्प
विशेष म्हणजे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा सर्वांना निरोप दिलाय. ट्रम्प यांनी निरोप देऊन सर्व सहकार्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, ही चार वर्षे आश्चर्यकारक होती. मला बरेच काही करता आले. आपणा सर्वांवर माझे प्रेम आहे, असं अमेरिकेतील लोकांना उद्देशून ट्रम्प म्हणाले. मी आपले राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले हे माझे सौभाग्य आहे. अलविदा, लवकरच आपण परत भेटू!
United States: Outgoing Vice President Mike Pence arrives at the US Capitol with his wife Karen Pence to attend the inauguration ceremony. pic.twitter.com/pSJZGReLaZ
— ANI (@ANI) January 20, 2021
आम्ही अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी बरीच कामे केली : डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्प म्हणाले की, आम्ही सैन्यात बरेच बदल केले. अंतराळ दल तयार केले, सुधारित कर कायदा तयार केला, ज्यामुळे लोकांचा फायदा झाला. आम्ही अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी बरीच कामे केली. राष्ट्रपती म्हणून संबोधनाचा शेवट संपवताना ट्रम्प म्हणाले की, ते नेहमीच अमेरिकेसाठी ‘लढा’ देत राहतील. आम्ही ही कोरोनावरची लस सर्वात वेगवानरीत्या बनविली असून, आम्ही लवकरच कोविडच्या साथीवर नियंत्रण मिळवू, असंही ट्रम्प यांनी अधोरेखित केले. चिनी विषाणूंमुळे आम्ही बरेच लोक गमावले.
United States: President-elect Joe Biden and his wife Jill Biden, and Vice President-elect Kamala Harris and her husband Doug Emhoff arrive at the US Capitol. https://t.co/BWPEC8UIgy pic.twitter.com/ymJ6zpOqDo
— ANI (@ANI) January 20, 2021
‘सदैव संघर्ष’ करत राहण्याचे वचन
ट्रम्प यांनी आगामी प्रशासनाचे अभिनंदन केले, उपराष्ट्रपती माईक पेन्स आणि द्वितीय महिला कॅरेन पेन्स आणि काँग्रेसचे आभार मानले. अध्यक्ष ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प फ्लोरिडासाठी संयुक्त बेस अँड्र्यूज सोडणार आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबीयांचेही आभार मानले आणि ‘नेहमीच लढा’ देण्याचे वचन दिले.
संबंधित बातम्या
Donld Trump | खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा जो बायडन यांना झटका, सरकारी विमान प्रवास नाकारला
ट्रम्पही असाही इतिहास घडवणार. द्विपक्षीय पद्धतच मोडीत काढणार?
joe biden inauguration us president live streaming india time vice president kamala harris oath ceremony watch online today