Pakistan : कराची पुन्हा स्फोटांनी हादरलं, 12 जणांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

Pakistan : कराची पुन्हा स्फोटांनी हादरलं,  12 जणांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

या भयाण स्फोटात 12 जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर जखमी 13 मधील आणखी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 18, 2021 | 6:49 PM

कराची : पाकिस्तानातील कराचीत सीवेज सिस्टममध्ये आज एक मोठा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यावरून या स्फोटाची दाहकता समजून येते. यात आणखी काही लोकांचे मृतदेह सापड्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

12 जणांचा मृत्यू, 13 जण गंभीर जखमी

बँकेच्या इमारतीखाली सीवर जमा झाल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अजून स्फोटचे ठोस कारण सांगितले नाही. त्यासाठी स्फोट कसा झाला आहे पाहण्यासाठी, त्याचा तपास करण्यासाठी तज्ज्ञांच्या एका टीमलाही बोलवण्यात आले आहे. या भयाण स्फोटात 12 जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे, तर इतर जखमी 13 मधील आणखी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण ज्यांना उपचारासाठी दाखल केले आहे, त्यातील काही जण दगावण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे, तर स्फोटाच्या ठिकाणीही आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. यात जे गंभीर जखमी आहेत त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट एवढा भयानक होता की, अजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या स्फोटामुळे फुटल्या आहेत. बाजुला उभे असलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. यात अधिकारी अधिकृतरित्या आणखी काही माहिती देण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात अशा स्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात कित्येकजणांनी आपला जीव गमावला आहे.

Beed : 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार, पंकजा मुंडेंची मोठी घोषणा

‘त्या’ ऑडिओ क्लिप खोट्या असल्याचं कोर्टात सिद्ध करून दाखवाच; सूर्यकांत दळवींचं कदमांना आव्हान

Entertainment : ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज या आठवड्यात मोठा पडदा आणि OTTवर होणार प्रदर्शित

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें