कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा करणारे विधेयक मंजूर, पाकिस्तानच्या संसदीय समितीचा निर्णय

पाकिस्तानमधील संसदीय समितीने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना करण्यात आलेल्या शिक्षेची समीक्षा करण्याचा निर्णय घेणारे विधेयक मंजूर केले आहे. (Kulbhushan  Jadhav death sentence will be reviewed by pakistans parliamentary committee passed bill)

कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा करणारे विधेयक मंजूर, पाकिस्तानच्या संसदीय समितीचा निर्णय

नवी दिल्ली: पाकिस्तानमधील संसदीय समितीने भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची समीक्षा करण्याचा निर्णय घेणारे विधेयक मंजूर केले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानुसार कुलभूषण जाधवच्या शिक्षेची समीक्षा करण्याचे आदेश दिले होते. (Kulbhushan Jadhav death sentence will be reviewed by pakistans parliamentary committee passed bill)

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशानुसार फाशीच्या शिक्षेची समीक्षा करणारे विधेयक मंजूर केल्याची माहिती आहे. “आंतरराष्ट्रीय न्यायालय (समीक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश ” असे विधेयकाचे नाव आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या कायदा आणि न्याय संबंधित स्थायी समितीने हे विधेयक मंजूर केले. पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. स्थायी समितीमध्ये आठ विरुद्ध पाच मतांनी विधेयक मंजूर झाले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशानुसार कुलभूषण जाधव याच्या शिक्षेची समीक्षा करणारे विधेयक मंजूर केल्याचे पाकिस्तानचे कायदामंत्री फरोग नसीम यांनी सांगतिले. जर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला असता तर देशावर निर्बंध लागले असते, असे प्रत्युत्तर नसीम यांनी विरोधकांना दिले.

भारतीय नौदलातून निवृत्त झालेले 50 वर्षीय कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. जुलै 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा आणि पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते.

पाकिस्तानातील मुस्लीम लीग- नवाज, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि जमीयत उलेमा-ए-इस्लाम या पक्षांनी कुलभूषण जाधवच्या शिक्षेची समीक्षा करणाऱ्या विधेयकाला विरोध केला. तर सत्ताधारी इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाने मतदानाचा मार्ग स्वीकारला.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सय्यद नवीद कुमार यांनी सत्ताधारी कुलभूषण जाधव यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. कुलभूषण जाधवच्या शिक्षेची समीक्षा करण्याचे विधेयक मंजूर केल्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची तक्रार करण्याची संधी मिळणार नाही, असं कायदा मंत्रालयानं सांगितले.

संबंधित बातम्या:

कुलभूषण जाधव खटला : वकील हरीश साळवे यांच्या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक

कुलभूषण जाधव खटला : परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचं संसदेत निवेदन

(Kulbhushan  Jadhav death sentence will be reviewed by Pakistan parliamentary committee passed bill)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *