'कोरोना'चा फटका चीनमधील भारतीयांना, पुणे-गडचिरोलीसह देशभरातील 27 विद्यार्थी अडकले

कोरोना वायरसमुळे चीनमधील हुबे विद्यापीठात अडकलेल्या 27 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, यवतमाळ, गडचिरोली, नांदेडच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Maharashtra Students Stuck in China, ‘कोरोना’चा फटका चीनमधील भारतीयांना, पुणे-गडचिरोलीसह देशभरातील 27 विद्यार्थी अडकले

गडचिरोली : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’ आजाराचा (Coronavirus) फटका तिथल्या भारतीय नागरिकांनाही बसला आहे. 27 भारतीय विद्यार्थी चीनमधील विद्यापीठात आठवडाभरापासून अडकून पडले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश (Maharashtra Students Stuck in China) आहे.

चीनमधील हुआन शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर सियानिग गावात ‘हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’मध्ये भारतीय विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. 27 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, यवतमाळ, गडचिरोली, नांदेडच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गडचिरोलीचे निवृत्त तहसीलदार दयाराम भोयर यांची कन्या सोनाली भोयरही तिथे शिकत आहे.

कोरोना विषाणू रोखण्यासाठी चीनची युद्ध पातळीवर तयारी, अवघ्या 10 दिवसात 1000 बेडचं नवं रुग्णालय

गेल्या आठवड्याभरापासून सियानिग गावातील काही नागरिकांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हुबे विद्यापीठाने सत्तावीस भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यास मनाई केली आहे.

विद्यार्थ्यांकडे असलेलं जेवणाचं साहित्यही संपायला आलं आहे. सातही जणांनी आपापल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.

हुबे विद्यापीठात अडकलेले महाराष्ट्रीय विद्यार्थी

1. सलोनी त्रिभुवन, पुणे
2. जयदीप देवकाते, पिंपरी चिंचवड, पुणे
3. आशिष गुरमे, लातूर
4. प्राची भालेराव, यवतमाळ
5. भाग्यश्री उके, भद्रावती, चंद्रपूर
6. सोनाली भोयर, गडचिरोली
7. कोमल जल्देवार, नांदेड

Maharashtra Students Stuck in China

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *