जो बायडन यांच्याकडून शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय वंशाच्या नेत्याकडे, महत्वाच्या समितीत वर्णी

जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी ‘प्रेसिडेंशिअल इनॉगरल कमिटीमध्ये भारतीय वंशाचे माजू वर्गीज यांची निवड केली आहे. Joe Biden Kamla Harris

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:50 AM, 2 Dec 2020
Maju Varghese US

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बायडन (Joe Biden) आणि उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा शपथविधी 20 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. भारतात पंतप्रधानांना शपथ देण्याचं काम राषट्रपती करतात. तर, राष्ट्रपतींना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. अमेरिकेत मात्र अध्यक्षदाच्या शपथविधी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एक समिती तयार करण्यात येते. या समितीला ‘प्रेसिडेंशिअल इनॉगरल कमिटी(Presidential Inaugural Committee) म्हटलं जाते. ही समिती 4 सदस्यांची असते.  भारतीय वंशाचे माजू वर्गीज यांची या समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. (Maju Varghese has become the member of US presidential inaugural committee)

जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी ‘प्रेसिडेंशिअल इनॉगरल कमिटी(Presidential Inaugural Committee) मध्ये भारतीय वंशाचे माजू वर्गीज यांची निवड केली आहे. ही समिती अमेरिकेतील 20 जानेवारीला होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. माजू वर्गीज यांची कार्यकारी निदेशक, मुख्य कार्यकारी अधिकारीपदी टोनी एलन, उपकार्यकारी निदेशक म्हणून एरिन विल्सन आणि वाना कैंसेला यांची निवड करण्यात आली आहे.

शपथविधीतून अमेरिकेचे सामर्थ्य दाखवणार

माजू वर्गीज यांनी अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही, अशा स्वरुपात शपथविधीचे आयोजन करण्यात येईल आणि त्याद्वारे अमेरिकेचं सामर्थ्य दाखवून दिलं जाणार असल्याचे सांगितले. जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे संयोजन समितीमध्ये समावेश होणे सन्मानाची बाब आहे, असेही वर्गीज म्हणाले. (Maju Varghese has become the member of US presidential inaugural committee)

जौ बायडन आणि कमला हॅरिस यांच्या ऐतिहासिक शपथविधीनंतर कोरोना महामारी विरोधात काम सुरु करणे आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी कामाला सुरुवात होईल, असं वर्गीज यांनी सांगितले. वर्गीज यांनी जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या प्रचार अभियानाचे प्रमुख संयोजक आणि वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहिलं आहे. माजू वर्गीज हे वकील असून त्यांचा जन्म अमेरिकेत झाला होता. वर्गीज यांचे आई-वडील केरळमधील तिरुवल्लामधून अमेरिकेला गेले होते.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन भारतीय वंशांच्या लोकप्रतिनिधींवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवत आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्रपती आहेत तर नीरा टंडन यांच्याकडे डायरेक्टर ऑफ द व्हाईट हाऊस ही जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वंशाच्या विवेक मूर्ती आणि प्रा. अरुण मजुमदार यांना  संधी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती आणि प्रा. अरुण मजुमदार यांना बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये महत्वाची खाती मिळणार असल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांमध्ये  प्रसिद्ध झाले आहे. वाशिंग्टन पोस्ट आणि पॉलिटिको यांनी याविषयी माहिती दिली आहे. (Maju Varghese has become the member of US presidential inaugural committee)

संबंधित बातम्या: 

आधी ओबामांसोबत महत्त्वाची जबाबदारी, आता बायडन यांच्या कॅबिनेटमध्येही भारतीय वंशाच्या दोघांची वर्णी निश्चित?

अमेरिकेच्या नियोजित अध्यक्षांकडून भारतीयांना दीपावलीच्या शुभेच्छा, जो बायडन म्हणाले…

(Maju Varghese has become the member of US presidential inaugural committee)