दिवसभर सोबत राहा, महिन्याला 35 लाख मिळवा, अब्जाधीश तरुणाची ऑफर

कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया : असिस्टंटला साधारणपणे किती पगार दिला जाईल? 50 हजार रुपयापर्यंत किंवा एक लाख रुपयापर्यंत असं तुमचं उत्तर असेल. पण एका 26 वर्षीय ऑस्ट्रेलियन अब्जाधीश तरुणाने असिस्टंट पाहिजे म्हणून सोशल मीडियावर जाहिरात दिली आहे. या कामासाठी तब्बल 35 लाख रुपये प्रति महिन्याची ऑफर आहे. मॅथ्यू लेपरे (Matthew Lepre) असं या 26 वर्षीय अब्जाधीशाचं नाव …

Matthew Lepre, दिवसभर सोबत राहा, महिन्याला 35 लाख मिळवा, अब्जाधीश तरुणाची ऑफर

कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया : असिस्टंटला साधारणपणे किती पगार दिला जाईल? 50 हजार रुपयापर्यंत किंवा एक लाख रुपयापर्यंत असं तुमचं उत्तर असेल. पण एका 26 वर्षीय ऑस्ट्रेलियन अब्जाधीश तरुणाने असिस्टंट पाहिजे म्हणून सोशल मीडियावर जाहिरात दिली आहे. या कामासाठी तब्बल 35 लाख रुपये प्रति महिन्याची ऑफर आहे. मॅथ्यू लेपरे (Matthew Lepre) असं या 26 वर्षीय अब्जाधीशाचं नाव आहे. कायमस्वरुपी सोबत राहणारा असिस्टंट हवा, अशी लेपरे यांची मागणी आहे. यासाठी ते प्रत्येक महिन्याला 52 हजार डॉलर म्हणजे जवळपास 35 लाख रुपये मोजायला तयार आहेत.

लेपरे यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पदासाठी आतापर्यंत 40 हजारपेक्षा जास्त लोकांनी अर्ज केलाय, ज्यात 30 हजारपेक्षा जास्त तरुणींचा समावेश आहे. लेपरे हे ई-कॉमर्ससंबंधी व्यवसाय करतात आणि त्यांच्या चार कंपन्या आहेत. यातून त्यांना प्रत्येक आठवड्याला 85764 डॉलर म्हणजे जवळपास 59.3 लाख रुपयांची कमाई होते. या जॉबला त्यांनी ‘The coolest job in the world’ असं टायटल दिलंय.

35 लाखांसोबतच या सुविधाही मिळणार

लेपरे यांचा पर्सनल असिस्टंट म्हणून निवड होणाऱ्या व्यक्तीला महिन्याला 35 लाख रुपये पगार तर मिळेलच, पण याशिवाय प्रवास, राहणं-खाणं आणि आरोग्य विमा यांसारख्या सुविधाही मिळतील. अनुभव आणि क्षमतेच्या आधारावर ही नोकरी दिली जाईल. मेल ऑनलाईनच्या वृत्तानुसार या नोकरीसाठी 40 हजार अर्ज आले असून त्यात 30 हजार महिला उमेदवार आहेत. विशेष म्हणजे अनेक महिलांनी लेपरे यांना लग्न करण्याचीही ऑफर दिली आहे.

Matthew Lepre, दिवसभर सोबत राहा, महिन्याला 35 लाख मिळवा, अब्जाधीश तरुणाची ऑफर

लेपरे यांच्या माहितीनुसार, जास्तीत जास्त अर्ज हे ब्रिटन, इटली, दक्षिण अमेरिका आणि आशियातून आले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये 23 ते 37 वर्ष वयोगटातील उमेदवारांचा समावेश आहे. अनेक अर्जात असं म्हटलंय, की आम्ही 9-5 या जॉबला वैतागलो असून कॉर्पोरेट लाईफमधून बाहेर पडायचंय. विशेष म्हणजे प्रवास करण्यासाठी अनेकांनी या जॉबला पसंती दिली आहे.

Matthew Lepre, दिवसभर सोबत राहा, महिन्याला 35 लाख मिळवा, अब्जाधीश तरुणाची ऑफर

जॉबसाठी काय करावं लागेल?

उमेदवाराला कम्प्युटरचं उत्तम ज्ञान असावं, अशी लेपरे यांची पहिली अट आहे. सोबतच उमेदवार हा सोशल मीडिया एक्स्पर्ट असावा. या गोष्टींमध्ये एक्स्पर्ट असण्याशिवाय उमेदवाराला नवीन काही तरी शिकण्याची इच्छा असावी. लेपरे नेमकं काय करतात हे उमेदवाराला माहित असावं. अधिक माहितीसाठी लेपरे यांचं यूट्यूब चॅनलही उपलब्ध आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *