मोदी सरकार मुस्लीम विरोधी : इम्रान खान

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार हे मुस्लीम विरोधी आणि पाकिस्तानी विरोधी असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचेपंतप्रधान इमरान खान यांनी  केलं आहे. वॉशिंग्टनपोस्टला दिलेल्या मुलाखतीत इमरानने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचा कुठेहीउल्लेख न करता, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 2019 साली भारतात लोकसभा निवडणुका आहेतत्यामुळे मोदी सरकार पाकिस्तानी विरोधी असल्याचं भासवत आहे. तसेच इमरान यांनी  करतारपूर …

मोदी सरकार मुस्लीम विरोधी : इम्रान खान

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार हे मुस्लीम विरोधी आणि पाकिस्तानी विरोधी असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचेपंतप्रधान इमरान खान यांनी  केलं आहे. वॉशिंग्टनपोस्टला दिलेल्या मुलाखतीत इमरानने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचा कुठेहीउल्लेख न करता, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. 2019 साली भारतात लोकसभा निवडणुका आहेतत्यामुळे मोदी सरकार पाकिस्तानी विरोधी असल्याचं भासवत आहे. तसेच इमरान यांनी  करतारपूर कॉरिडोर आणि मुंबईच्या 26/11 हल्ल्याचा देखील उल्लेख केला.

इमरान खान म्हणाले की, “भारतातील विद्यामान सरकार अँटी मुस्लीम आणि अँटी पाकिस्तानी अर्थात मुसलमान आणि पाकिस्तान विरोधी असल्याचं सांगितलं. तसेच इमरान खान यांना मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर, इमरान यांनी या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांवर न्यायालयात ट्रायल सुरु आहे. या हल्ल्यातील दोषींवर शिक्षा व्हावी अशी भावना इमरान खान यांनी व्यक्त केली.”  

इमरान खान पुढे म्हणाले की, “मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याबाबतची माहिती  पाकिस्तान सरकारला गोळा करण्यास सांगितली असल्याचा दावाही इमरान यांनी केला. ही माहिती गोळा केल्यानंतर हा हल्ल्याचा कट कशा रचला त्यामुळे खबरदारी म्हणून, त्याचा फायदा पाकिस्तानलाही आतंकवादी हल्ले रोखण्यासाठी होणार आहे. तसेच पाकव्याप्त पंजाबमध्ये असलेल्या गुरुग्रामच्या दर्शनासाठी शीख बांधवांना करतारपूर कॉरिडोर लवकरच खुला करणार असल्याचं सांगितलं.” भारतात 2019 ला लोकसभा निवडणुका असल्याने मोदी सरकार भारतभर पाकिस्तानी आणि मुस्लीम विरोधी असल्याचं भासवत आहे. असं भासवत जरी असलं निवडणुका पार पडल्यानंतर भारत पाकिस्तानशी चांगली चर्चा करेल, अशी अशा इमरान खान यांनी व्यक्त केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *