जगातील सर्वात वेगळ्या मंत्रिमंडळाची निवड, न्यूझीलंडच्या जेसिंडा मंत्रिमंडळातील थक्क करणाऱ्या 9 गोष्टी

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी प्रचंड क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. त्यांचं मंत्रिमंडळ जगासाठी आदर्श असल्याचं मत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

जगातील सर्वात वेगळ्या मंत्रिमंडळाची निवड, न्यूझीलंडच्या जेसिंडा मंत्रिमंडळातील थक्क करणाऱ्या 9 गोष्टी
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 8:45 PM

वेलिंग्टन : जगभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर न्यूझीलंडला दोनदा कोरोनामुक्त करणाऱ्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांना पुन्हा एकदा मोठं बहुमत मिळालं आहे. या दुसऱ्या वेळच्या विजयासह आर्डर्न यांनी प्रचंड क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. त्यांचं मंत्रिमंडळ जगासाठी आदर्श असल्याचं मत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. एकिकडे जगभरात जात-धर्म-लिंग-पंथ-वर्ण यावरुन फूट पाडली जात असताना जेसिंडा आर्डर्न यांनी जगाला दिशा दाखवल्याचंही बोललं जात आहे (Most inclusive cabinet of the world by New Zealand PM Jacinda Ardern).

पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्या मंत्रिमंडळाविषयी सामाजिक क्रांती करणारे 9 वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

1. जेसिंडा आर्डर्न यांच्या नव्या मंत्रिमंडळात 50 टक्के महिलांना संधी देण्यात आली आहे. जगभरात संसदीय राजकारणात महिलांचा सहभाग सरासरी केवळ 24 टक्के इतका अत्यल्प आहे. त्यामुळे आर्डर्न यांचा हा निर्णय महिलांच्या प्रतिनिधीत्वाच्या विषयात खूप महत्त्वाचा मानला जात आहे. खऱ्या अर्थाने संख्येच्या बाबत 50 टक्के वाटा असलेल्या महिलांना राजकीय स्तरावर देखील त्यांचा हक्काची संधी मिळाल्याचं मत नोंदवलं जात आहे.

2. आर्डर्न यांच्या मागील मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेल्या ग्रांट रॉबर्टसन यांना यावळी उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. ग्रांट समलैंगिक आहेत आणि त्यांनी आपली ही ओळख कधीही लपवलेली नाही. त्यांच्या देशात आणि जगभरात त्यांची हीच ओळख आहे. न्‍यूझीलंडच्या इतिहासात पहिल्यांदा एक समलैंगिक व्‍यक्ती उपपंतप्रधान होत आहे.

3. जेसिंडा आर्डर्न यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री झालेल्या ननाइया माहुता सध्या जोरदार चर्चेत आहेत. न्‍यूझीलंड जगातील असा पहिला देश आहे जेथे एका आदिवासी (इंडिजीनस) महिलेला परराष्ट्र मंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ननाइया न्यूझीलंडमधील मारोई जमातीतील आहेत. मारोई जमातीत परंपरेनुसार हनवटीवर टॅटू गोंदवला जातो. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाचा चर्चेचा विषय ठरला आहे.

4. आर्डर्न यांच्या या मंत्रिमंडळात 10 टक्के लोक सार्वजनिकपणे गे, लेस्बियन, होमोसेक्‍सुअल आणि ट्रान्सजेंडर आहेत. अशाप्रकारची विविधता आणि सर्वसमावेशकता पाळण्यात न्‍यूझीलंडने यूनायटेड किंग्डमला देखील मागे टाकलं आहे. यूकेची संसद  हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 7 टक्के लोक समलैंगिक आहेत.

5. जेसिंडा आर्डर्न यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्वतःच्या लेबर पार्टीच्या खासदारांसोबत ग्रीन पार्टीच्या दोन सदस्यांना देखील स्थान दिलं आहे. ग्रीन पार्टीचे खासदार जेम्‍स शॉ यांच्याकडे हवामान बदल मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

6. जेसिंडा यांच्या सरकारने कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी या विषयाचं स्वतंत्र खातं बनवलं असून त्याला स्वतंत्र मंत्री आहे. या मंत्रालयाची जबाबदारी मरामा डेविडसन यांना देण्यात आली आहे. त्या 46 वर्षीय असून ग्रीन पक्षाच्या सदस्य आहेत.

7. आर्डर्न यांच्या या मंत्रिमंडळात एकूण 20 सदस्‍यांपैकी 7 सदस्‍य आदिवासी (इंडिजीनस) समुहातील आहेत. 5 मारोई समुहातील आणि 3 पॅसिफिका समुहातील आहेत.

8. भारतीय वंशाच्या महिलेला न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच स्थान मिळालं आहे. मूळच्या केरळच्या असलेल्या प्रियंका राधाकृष्‍णन यांना 4 महत्‍वाच्या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. यात मिनिस्‍ट्री ऑफ डायव्हर्सिटी, इंक्‍लूजन अँड इथनिक कम्‍युनिटीज, मिनिस्‍ट्री ऑफ कम्‍युनिटी अँड वॉलंटरी सेक्‍टर आणि सोशल डेव्हलपमेंट अँड इम्प्लॉयमेंट मिनिस्‍ट्रीचा समावेश आहे.

9. नव्याने संसदेची सदस्‍य झालेल्या आणि व्यवसायाने संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञ डॉक्‍टर आयेशा वेराल्‍ल मागील सरकारच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेसिंडा यांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होत्या. यावेळी त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे आरोग्य, अन्न सुरक्षा आणि वैज्ञानिक संशोधन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय.

संबंधित बातम्या :

आधी पंतप्रधानपदावर असताना मुलीला जन्म, आता बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार

Most inclusive cabinet of the world by New Zealand PM Jacinda Ardern

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.