क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी महिलेने जुळ्या मुलांना विकले

एका महिलेने क्रेडिट कार्डचे बिल (Credit Card Bill) भरण्यासाठी चक्क स्वत:च्या दोन जुळ्या मुलांना (mother sold her newborn twin babies) विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी महिलेने जुळ्या मुलांना विकले

बीजिंग (चीन) : क्रेडिट कार्डच्या (Credit Card Bill) बिलाचे पैसे चुकवण्यासाठी अनेकजण कर्ज काढतात. तर काही जण मित्रांकडून पैसे उधार घेऊन क्रेडिट कार्डचे बिल भरतात. मात्र एका महिलेने क्रेडिट कार्डचे बिल (Credit Card Bill) भरण्यासाठी चक्क स्वत:च्या दोन जुळ्या मुलांना (mother sold her newborn twin babies) विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चीनच्या (China) झेजिआंगमधील सिक्सी या ठिकाणी ही घटना घडली आहे. डेली मेल या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी चीनमध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला महागडे मोबाईल, कपडे यासंह इतर गोष्टींचा शौक होता. तिचे क्रेडिट कार्डचे बिल (Credit Card Bill) 6 लाख 56 हजार रुपये झाले होते. हे बिल भरण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याने तिने तिच्या दोन्ही मुलांना (mother sold her newborn twin babies) विकण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार तिने दोन्ही मुलांना वेगवेगळ्या कुटुंबाला विकले. मुलं खरेदी करणारी दोन्ही कुटुंब तिच्या घरापासून 700 किमी लांब राहतात. त्या मुलांना विकल्यानंतर महिलेला एका कुटुंबाकडून 4.5 लाख, तर दुसऱ्या कुटुंबाकडून 2 लाख रुपये मिळाले. मुलांना विकलेल्यानंतर मिळालेल्या पैशातून तिने नवीन फोन खरेदी केला. तसेच क्रेडिट कार्डचे बिलही  भरले.

मात्र त्यानंतर या घटनेची स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेला अटक केली असून दोन्ही बाळांना रेस्क्यू केले आहे. त्या बाळांना त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. चीनच्या नव्या कायद्यानुसार, बाळांच्या तस्करीत सहभागी होण्यासाठी त्या महिलेला 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला साधारण वय 20 ते 25 असू शकते. या महिलेने सप्टेंबरमध्ये दोन प्रिमॅच्युअर बाळांना जन्म दिला. या बाळांच्या जन्मानंतर तिचा जोडीदार तिला बघण्यासाठी रुग्णालयात आला नाही. त्याशिवाय जोडीदाराचे आईवडील तिला बघण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे या महिलेला ही दोन्ही बाळ ओझं वाटू लागली. त्यामुळे तिने या मुलांना विकले.

या मुलांना विकल्यानंतर तिचा जोडीदार तिच्याकडे आपला हिस्सा मागण्यासाठी आला. त्यावेळी महिलेने सर्व पैसे खर्च झालेत असे सांगितले. दरम्यान पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *