आधी पंतप्रधानपदावर असताना मुलीला जन्म, आता बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न आणि गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेले त्यांचे बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड विवाहबद्ध होणार आहेत. अर्डर्न आणि गेफोर्ड यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमी युगुल ईस्टरच्या सुट्ट्यांमध्ये लग्न करणार आहे. लग्नाच्या मुहूर्ताबाबत एकमत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रेमी युगुलाची एक मुलगीही आहे. या मुलीचं नाव नीवी ठेवण्यात आलंय. गेल्या …

new zealand prime minister jacinda ardern, आधी पंतप्रधानपदावर असताना मुलीला जन्म, आता बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न आणि गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेले त्यांचे बॉयफ्रेंड क्लार्क गेफोर्ड विवाहबद्ध होणार आहेत. अर्डर्न आणि गेफोर्ड यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रेमी युगुल ईस्टरच्या सुट्ट्यांमध्ये लग्न करणार आहे. लग्नाच्या मुहूर्ताबाबत एकमत झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रेमी युगुलाची एक मुलगीही आहे. या मुलीचं नाव नीवी ठेवण्यात आलंय. गेल्या वर्षी जूनमध्ये या मुलीचा जन्म झाला होता. लग्नाचा प्रस्ताव नेमका कुणी ठेवला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पण ईस्टरच्या मुहूर्तावर लग्न करण्याचं जाहीर करण्यात आलंय.

पदावर असताना मुलाला जन्म देणाऱ्या अर्डर्न या जगातील दुसऱ्या पंतप्रधान ठरल्या होत्या. मुलीच्या जन्मानंतर अर्डर्न यांचे बॉयफ्रेंड गेफोर्ड यांनी घरी राहून मुलीचा सांभाळ केला आणि अर्डर्न यांनी देशाची जबाबदारी सांभाळली. जागतिक व्यासपीठावरही अर्डर्न या मुलीला घेऊन गेल्या होत्या. 38 वर्षीय गेफोर्ड हे फिशिंग शो होस्ट करतात.

पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. त्यांनी पीडितांना ज्या पद्धतीने मदत केली, त्याबाबत जगभरातून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. या हल्ल्यात 45 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर पंतप्रधान अर्डर्न यांनी हिजाब घालून मुस्लीम असलेल्या पीडितांची विचारपूस केली होती. त्यामुळेच त्यांचं कौतुकही करण्यात आलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *