पुरावे मागण्यापेक्षा ‘जैश’वर कारवाई कर, घटस्फोटीत पत्नीने इम्रानला तोंडावर पाडलं

इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्याप्रकरणी (Pulwama Attack) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने भारताकडे पुराव्याची मागणी केली. मात्र इम्रानच्या घटस्फोटीत पत्नीनेच त्याला घरचा आहेर दाखवत, एकप्रकारे पुरावे दिले. इम्रान खान हे पाकिस्तानी सैन्याच्या हातचं बाहुलं असल्याचा घणाघात मेहर खानने केला. पुलवामा हल्ल्याप्रकरणी इम्रान खानने जे स्पष्टीकरण दिलं ते सैन्याच्याआदेशानेच दिल्याचा दावा रेहम खानने केला. सैन्याच्या आशिर्वादानेच इम्रान खान सत्तेत […]

पुरावे मागण्यापेक्षा 'जैश'वर कारवाई कर, घटस्फोटीत पत्नीने इम्रानला तोंडावर पाडलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्याप्रकरणी (Pulwama Attack) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने भारताकडे पुराव्याची मागणी केली. मात्र इम्रानच्या घटस्फोटीत पत्नीनेच त्याला घरचा आहेर दाखवत, एकप्रकारे पुरावे दिले. इम्रान खान हे पाकिस्तानी सैन्याच्या हातचं बाहुलं असल्याचा घणाघात मेहर खानने केला. पुलवामा हल्ल्याप्रकरणी इम्रान खानने जे स्पष्टीकरण दिलं ते सैन्याच्याआदेशानेच दिल्याचा दावा रेहम खानने केला. सैन्याच्या आशिर्वादानेच इम्रान खान सत्तेत आल्याचा हल्लाबोल रेहमने केला.

जैश ए मोहम्मद या संघटनेसोबत पाकिस्तान सरकारचा काही संबंध नसेलही, मात्र अशा संघटनांविरोधात काहीही कारवाई केलेली नाही, असं म्हणत रेहम खानने इम्रानला एकप्रकारे पुरावा दिला. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यासारख्या संघटनांवर आधीच कारवाई व्हायला हवी होती. जैशने तर पुलवामा हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे, असं ट्विट रेहम खानने केलं आहे.

इम्रान खान आपली विचारधारा आणि नीतीमूल्ये बाजूला ठेवून सत्तेत आला आहे. इम्रान खानने जे भाष्य केलं आहे, ते सैन्याच्या निर्देशानेच केलं आहे. लष्कराला जे हवं असतं, ते इम्रान खानकडून वदवून घेतलं जातं. निवडणुकांमध्ये अनेक दंगली घडवण्यात आल्या. दंगली झाल्या, त्याकडे इम्रान खानने डोळेझाक केली असा आरोप रेहम खानने केला.

इम्रान खानने पुलवामा हल्ल्याप्रकरणी मंगळवारी भारताला उद्देशून स्पष्टीकरण दिलं. पुरावे द्या आम्ही कारवाई करु, मात्र युद्ध केल्यास आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा इम्रान खानने भारताला दिला. त्यानंतर रेहम खानने इम्रानवर आगपाखड केली.

इम्रानला जे शिकवण्यात आलं, तसंच तो बोलत आहे. जर तो कारवाई करण्याचा दावा करत असेल, तर त्याने आधी ती कारवाई करुन दाखवावी. आमचा देश आर्थिक बाबतीत काळ्या यादीत जाण्याच्या मार्गावर आहे. हे काही पुलवामा हल्ल्यानंतर नाही, असं रेहम खान म्हणाली.

भारताला हवी म्हणून कारवाई करु नये, तर पाकिस्तानाच्या हितासाठी इम्रान खानने कारवाई करावी, असाही सल्ला रेहम खानने दिला. इम्रान खान कारवाईची भाषा करत असला तरी त्याने गेल्या सात महिन्यात कोणतंच पाऊल उचललं नाही. जैश ए मोहम्मद या संघटनेसोबत पाकिस्तान सरकारचा काही संबंध नसेलही, मात्र अशा संघटनांविरोधात काहीही कारवाई केलेली नाही, असं म्हणत रेहम खानने इम्रानला आरसा दाखवला.

कोण आहे रेहम खान? रेहम खान पाकिस्तानातील पत्रकार आहे. रेहम खान मूळची पाकिस्तानची आहे, मात्र पहिल्या लग्नानंतर ती ब्रिटनमध्ये रहात होती. रेहमनं पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर इम्रान खानशी निकाह केला होता. पहिल्या पतीपासून तिला तीन मुलं आहेत. बीबीसीवर ‘साऊथ टूडे’ हा प्रादेशिक कार्यक्रम आणि हवामानाचा अंदाज सादर करण्याची रेहमची जबाबदारी होती. इम्राननंही त्याची पहिली पत्नी जेमिमा खानपासून 2004 साली घटस्फोट घेतला होता. त्या दोघांनाही दोन मुलं आहेत. या घटस्फोटानंतर इम्रान-रेहमचा निकाह झाला. दहा महिन्यानंतर त्यांचा तलाख झाला.

इम्रान-रेहमचा दहा महिन्यात काडीमोड

टीव्ही अँकर असलेल्या रेहम खान आणि इम्रान खान यांचा 2015 मध्ये निकाह झाला होता. त्यावेळी इम्रान खान 62 तर रेहम खान 41 वर्षांची होती. मात्र अवघ्या 10 महिन्यात दोघांनी काडीमोड घेतला होता. इम्रान खानचं हे दुसरं लग्न होतं.

याआधी इम्रानने इंग्लंडमधील जेमिमा गोल्डस्मिथसोबत लग्नही केलं होतं. मात्र, 9 वर्षाच्या संसारानंतर हे लग्न जून 2004 मध्ये मोडलं होतं. रेहमने देखील याआधी एक लग्न केलं होतं. रेहमला तीन मुलं सुद्धा आहेत. बीबीसीमधील नोकरी सोडून रेहम पाकिस्तानमध्ये परतली होती.

रेहमसोबत काडीमोड झाल्यानंतर इम्रानने 2018 मध्ये तिसरं लग्न केलं. इम्रानने 40 वर्षीय बुशरा मनेकाशी निकाह केला. बुशरा यांना दोन मुलं आणि तीन मुली आहेत.

इम्रान खान काय म्हणाला?

“पुलवामा हल्ल्याप्रकरणी भारत सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तान सरकारवर आरोप केले. आम्ही स्थैर्याकडे जात असताना, हल्ला कशाला करु. पुरावे द्या कारवाईची आम्ही हमी देतो. हल्ला करुन पाकिस्तानला काय मिळेल? काश्मीरमधील हल्ल्यांना दोष देण्यापेक्षा तो प्रश्न सोडवू. तुम्ही युद्ध केलं तर ते युद्ध आम्ही संपवू”, असा इशारा इम्रान खान यांनी दिला. आम्हाला माहित आहे युद्ध सुरु करणं सोपं असतं, मात्र युद्ध सुरु करणं माणसांच्या हातात असतं, युद्ध थांबवणं माणसांच्या हातात नसतं. तुमचं निवडणुकीचं वर्ष आहे, जर तुम्ही समजत असाल की पाकिस्तानवर हल्ला करु, तर पाकिस्तानही विचार करणार नाही, उत्तर देईल, असा इशारा इम्रान खान यांनी दिला.

संबंधित बातम्या 

इम्रान खान किती पुरावे हवे? भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे!   

पुरावे द्या, कारवाई करु, पण युद्ध केल्यास उत्तर देऊ: इम्रान खान

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.