'भारतासोबत युद्ध झालं, तर पाक हरेल', खुद्द इम्रान खान यांची कबुली

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर पाकिस्तान सतत भारताला युद्धाची धमकी देत आहे. मात्र, पाक भारताशी युद्धात जिंकू शकत नाही (India-Pakistan Atomic War), असं खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pak PM Imran Khan) यांनी मानलं.

'भारतासोबत युद्ध झालं, तर पाक हरेल', खुद्द इम्रान खान यांची कबुली

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर पाकिस्तान सतत भारताला युद्धाची धमकी देत आहे. मात्र, पाक भारताशी युद्धात जिंकू शकत नाही (India-Pakistan Atomic War), असं खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pak PM Imran Khan) यांनी मानलं.

पाकिस्तान भारताशी अणू युद्धात जिंकू शकत नाही, युद्ध झालं तर पाकिस्तान पराभूत होईल (Pakistan will loose war from India), मात्र याचे परिणाम गंभीर असतील, असं इम्रान खान यांनी म्हटलं.

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान इम्रान खान यांना पाकिस्तानवरील अणू धोक्याबाबत विचारणा करण्यात आली. “पाकिस्तान कधी स्वत:हून अणू युद्धाची सुरुवात करणार नाही, असं मी म्हटलं होतं. यामध्ये कुठलीही शंका नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटत नसतात, असं मी मानतो. युद्धाचे अत्यंत वाईट परिणाम पाहायला मिळतात. तुम्ही विएतनाम, इराकचं युद्ध पाहा, यामुळे इतर अनेक समस्या उद्धवतील. त्या समस्या युद्धाच्या कारणापेक्षा अधिक गंभीर असतील”, असं इम्रान खान यांनी सांगितलं.

“जेव्हाही दोन अणू संपन्न देश पूर्वीपासून चालत आलेली लढाई लढत असतात (conventional war), तेव्हा ती लढाई अणू युद्धाने संपण्याची शक्यता असते, हे मला माहीत आहे. जर देश या युद्धात पराभूत होत असेल, तर देशासमोर दोन पर्याय असतील, एकतर आम्ही पराभव पत्करावा किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं. अशा परिस्थितीत पाकिस्तान स्वातंत्र्यासाठी आपले प्राणही पणाला लावेल. जेव्हा कुठलाही अणू संपन्न देश शेवटपर्यंत युद्ध लढतो, तेव्हा याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात”, असंही इम्रान म्हणाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी भारतावर अणू हल्ला करण्याची धमकी दिली होती. “भारताने हे लक्षात ठेवावं की, पाकिस्तानजवळ पाव किलो आणि अर्धा पाव किलोचे अणू बॉम्बही आहेत. जे एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी निशाणा साधू शकतात”, असं शेख रशीद अहमद म्हणाले होते.

पाक रेल्वे मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यांची खिल्ली उडवली होती.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानातून कांद्यांची आयात, स्थानिक शेतकरी संतप्त

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, पेट्रोल-डिझेलपेक्षा दुधाची किंमत जास्त

UNHRC : पाकिस्तानची खोटेपणाची कॉमेंट्री, काश्मीरप्रश्नी भारताचे खडेबोल

किमान औषधं तरी पाठवा, महिन्याभरात पाकिस्तान वठणीवर

भारताला दोष देताना पाकिस्तानची फसगत, पॉर्न स्टारचा फोटो काश्मीर पीडित म्हणून पोस्ट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *