चीनमध्ये इम्रान खानच्या स्वागताला उपमहापौर, पाकिस्तानी भडकले

बीजिंग : पाकिस्तानचे नेते आणि पंतप्रधान जगभरात दौरा करतात तेव्हा विविध कारणांमुळे ते चर्चेत असतात. गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनमध्ये चार दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले. पण त्यांच्या स्वागतासाठी चक्क उपमहापौराला पाठवण्यात आलं. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाचं स्वागत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी किंवा मंत्र्यांकडून केलं जातं. पण उपमहापौराकडून स्वागत केल्यामुळे पाकिस्तानमधील सोशल मीडिया युझर्सही संतापले होते. चीन …

Imran khan welcome, चीनमध्ये इम्रान खानच्या स्वागताला उपमहापौर, पाकिस्तानी भडकले

बीजिंग : पाकिस्तानचे नेते आणि पंतप्रधान जगभरात दौरा करतात तेव्हा विविध कारणांमुळे ते चर्चेत असतात. गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनमध्ये चार दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले. पण त्यांच्या स्वागतासाठी चक्क उपमहापौराला पाठवण्यात आलं. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाचं स्वागत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी किंवा मंत्र्यांकडून केलं जातं. पण उपमहापौराकडून स्वागत केल्यामुळे पाकिस्तानमधील सोशल मीडिया युझर्सही संतापले होते.

चीन आणि पाकिस्तानची यांची मैत्री असल्याचं जगभर सांगितलं जातं. पण इम्रान खान यांचं स्वागत पाहून ही मैत्री कशी आहे हे सर्वांनाच समजलं. इम्रान खान यांचं स्वागत बीजिंग महापालिका कमिटीच्या उपसचिव जनरल ली लिफेंग यांनी केलं. त्यांच्यासोबत पाकिस्तान आणि चीनचे राजदूतही उपस्थित होते. इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे रेल्वेमंत्री, जलमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे सल्लागारही चीन दौऱ्यावर आहेत.

चीन आमचा सर्वात जवळचा मित्र असून मी माझे प्रिय मंत्री राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे, असं इम्रान खान यांनी चीनला रवाना होण्यापूर्वी म्हटलं होतं. चीनला जाण्यापूर्वी इम्रान खान मैत्रीची उदाहरणं देत जिनपिंग यांचं कौतुक करत होते. पण विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपमहापौराला पाठवण्यात आलं आणि इम्रान खान यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

Imran khan welcome, चीनमध्ये इम्रान खानच्या स्वागताला उपमहापौर, पाकिस्तानी भडकले

इम्रान खान यांचं हे आदरातिथ्य पाहून पाकिस्तानी लोकांना ट्रोल करण्यात आलं. ईराण सरकारनंतर आता चीन सरकारनेही इम्रान खान यांच्या स्वागतासाठी अधिकारी पाठवला नाही. पाकिस्तान दुतावासाच्या कर्मचाऱ्यांनाच इम्रान खान यांचं स्वागत करावं लागलं, असं अभिविर सिंह नावाच्या एका सोशल मीडिया युझरने म्हटलंय.

Imran khan welcome, चीनमध्ये इम्रान खानच्या स्वागताला उपमहापौर, पाकिस्तानी भडकले

इस्लामाबादच्या महापौराचं स्वागत बीजिंगच्या उपमहापौराने केलं, असा टोमणा मोहम्मद ताकी नावाच्या युझरने लगावला.

Imran khan welcome, चीनमध्ये इम्रान खानच्या स्वागताला उपमहापौर, पाकिस्तानी भडकले

पाकिस्तानच्या एका पत्रकाराने राग व्यक्त केला. नवा पाकिस्तान तयार झाल्यानंतर जग आपल्यासोबत कसं वागतंय. ना मंत्री, ना कुणी अधिकारी. बीजिंग महापालिकेच्या उपमहापौराने यांचं स्वागत केलं, असं या पत्रकाराने म्हटलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *