पाकिस्तानी खासदाराचा 49 व्या वर्षी 18 वर्षाच्या मुलीशी तिसरा निकाह, आमिर लियाकत हुसैनच्या लग्नानं सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक -ए- इन्स्फाफ म्हणजेच पीटीआय पार्टीचे नेते आणि खासदार आमिर लियाकत हुसैन (Aamir Liaquat Husain) सध्या चर्चेत आहेत.

पाकिस्तानी खासदाराचा 49 व्या वर्षी 18 वर्षाच्या मुलीशी तिसरा निकाह, आमिर लियाकत हुसैनच्या लग्नानं सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Amir Liyakat Hussain (Twitter)
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 10:40 AM

नवी दिल्ली : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक -ए- इन्स्फाफ म्हणजेच पीटीआय पार्टीचे नेते आणि खासदार आमिर लियाकत हुसैन (Aamir Liaquat Husain) सध्या चर्चेत आहेत. 49 वर्षीय नेते आमिर लियाकत हुसैन यांनी ट्विटवर 18 वर्षाच्या सैयदा दानिया शाह (Syeda Dania Shah) हिच्याशी लग्न केल्याची माहिती दिली आहे. आमिर लियाकत हुसैन यांचं हे तिसरं लग्न आहे. आमिर हुसैन यांची दुसरी पत्नी सैयदा तूबा अनवर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून तलाक संदर्भात माहिती दिली होती. आमिर लियाकत हुसैन एक ट्विट करुन लग्नाबद्दल माहिती दिली होती. दक्षिण पंजाबच्या लोधरानमधील सदाआत कुटुंबातील सैयदा दानिया शाह हिच्याशी निकाह केला असून तिचं वय 18 वर्ष आहे. लियाकत हुसैन यांनी चाहत्यांनी शुभेच्छा द्याव्यात असं म्हटलंय. यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद उफाळून आला असून चर्चांना सुरुवात झालीय. दुसऱ्या पत्नीला तलाक दिल्याच्या दुसऱ्या दिवशी आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरा निकाह केला.

आमिर लियाकत हुसैन यांचं ट्विट

सैयदा दानिया शाह आमिर लियाकत हुसैन यांची फॅन

आमिर लियाकत हुसैन यांच्याशी लग्न झाल्यानंतर सैयदा दानिया शाह हिने माध्यमांशी संवाद साधला. आमिर लियाकत हुसैन हे लहानपणापासून आदर्श असल्याचं म्हटलं आहे. लहानपणी ज्यावेळी रडत असे त्यावेळी माझे आई वडिल टीव्हीवर आमिर लियाकत हुसैन यांचा फोटो दाखवत असल्याची सैयदा हुसैन हिनं सांगितलं.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरा निकाह केल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्याऱ्या मीम्सचा पाऊस सोशल मीडियावर पडला. फेब्रुवारी या ट्विट अकाऊंटवरुन आमिर हुसैन यांचा एक फोटो ट्विट कत आमिर लियाकत हुसैन यांनी 18 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीला हातात घेतल्याचं म्हटलंय.

आणखी एक ट्विट

आमिर लियाकत हुसैन आणि सैयदा दानिया शाह यांच्या वयातील अंतरावरुन टीका करणारी अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कॅप्टन मँगो या यूजरचं ट्विट

2018 मध्ये दुसरं लग्न

लियाकत हुसैन याच्या ट्विटच्या एक दिवस अगोदर दुसरी पत्नी सैयदा तूबा अनवर हिला तलाक संदर्भात माहिती दिली होती. सैयदा तूबा अनवर हिनं 2018 मध्ये आमिर लियाकत हुसैन याच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर आता सैयदा तूबा अनवर हिला तलाक देत आमिर लियाकत हुसैन यानं तिसरं लग्न केलंय.

इतर बातम्या:

Sayali Sanjeev : अभिनेत्री सायली संजीवच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, फोटो शेअर करत म्हणाली…

म्हणाला मी ‘कोकाकोला’चा सीईओ, टिंडर डेटिंग अ‍ॅपवर ओळख, औरंगाबादेत उच्चशिक्षित महिलेला 97 हजारांचा गंडा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.