भारत पुन्हा पाकवर हल्ला करणार, पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांचा दावा

कराची : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करणार आहे, असा थेट आरोप केला आहे. भारत पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असं शाह महमूद कुरैशी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. इस्लामाबादने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या सदस्यांकडे याबाबत चिंता व्यक्त केली. इतकंच नाही, तर भारत …

भारत पुन्हा पाकवर हल्ला करणार, पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांचा दावा

कराची : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करणार आहे, असा थेट आरोप केला आहे. भारत पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असं शाह महमूद कुरैशी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. इस्लामाबादने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या सदस्यांकडे याबाबत चिंता व्यक्त केली. इतकंच नाही, तर भारत 16 ते 20 एप्रिलदरम्यान पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचा दावा शाह महमूद कुरैशी यांनी केला.

भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा असं इम्रान खान सरकारला वाटत नाही. तसेच, “आमच्याकडे भारताच्या या षड्यंत्राबाबत सर्व माहिती आहे”, असा दावाही कुरैशी यांनी केला. तर पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालोकोट येथे दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला होता. त्यावर “27 फेब्रुवारीला जेव्हा भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, तेव्हा सर्वांना हे माहित होतं की भारताने आंतरराष्ट्रीय कायद्यांचं आणि संयुक्त राष्ट्र चार्टरच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. तरीही संपूर्ण जग शांत होतं”, असा सवालही कुरैशी यांनी उपस्थित केला.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आतंकवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. याविरोधात कारवाई करताना 27 फेब्रुवारीला भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा खात्मा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने पुन्हा भारतात घुसन्याचा प्रयत्न केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *