भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानचं ड्रोन पाडलं

जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला आक्रमक उत्तर दिले. मात्र या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. यासोबतच पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतीय सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी (9 मार्च) सकाळी 5.40 च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा भारतात ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने हे ड्रोन …

भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानचं ड्रोन पाडलं

जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला आक्रमक उत्तर दिले. मात्र या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. यासोबतच पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे भारतीय सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी (9 मार्च) सकाळी 5.40 च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा भारतात ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने हे ड्रोन पाडल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं. भारताने पाडलेलं हे पाकिस्तानचं तिसरं ड्रोन आहे.

पाकिस्तानने तिसऱ्यांदा हे ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला. याआधीही भारताने पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पाकिस्तानी ड्रोनने शनिवारी सकाळी 5 वाजून 40 मि. च्या सुमारास श्रीगंगानगर हिंदुमलकोट आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याला हे ड्रोन दिसताच त्यांनी त्यावर हल्ला केला.

याआधीही पाकिस्तानी ड्रोन राजस्थानच्या बीकानेर सीमारेषेवरील अनूपगढ सेक्टरमध्ये घुसले होते. या ड्रोनला भारतीय वायूसेनेने हल्ला करत पाडले. वायूसेनेच्या जेट विमानाने हवेत मिसाईल सोडत हे ड्रोन उडवले होते.

त्याआधी 26 फेब्रुवारीला भारतीय सैन्याने पाकिस्तान सीमेच्या कच्छ येथे घुसून पाकिस्तानचे रिमोट कंट्रोलवाले ड्रोन पाडले. कच्छ येथील गावातील लोकांनाही यावेळी बॉम्ब फुटल्याचा आवाज आला होता, तसंच ड्रोनच्या सांगाड्याचे तुकडेही मिळाले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *