न्यूड व्हिडीओ लीकवरून तिसर्‍या पत्नीला पाकच्या खासदाराने फटकारले, म्हणाला- लग्नाला कलंकित केलस, अल्लाह माफ करणार नाही

न्यूड व्हिडीओ लीकवरून तिसर्‍या पत्नीला पाकच्या खासदाराने फटकारले, म्हणाला- लग्नाला कलंकित केलस, अल्लाह माफ करणार नाही
पीटीआय पार्टीचे खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकत
Image Credit source: tv9

दानियाने जे केले ते निकाह सारखे पाक संबंध कलंकित करणारे आहे. लियाकत म्हणाले, या व्हिडिओंमध्ये असल्यामुळे लोक माझी चेष्टा करत आहेत.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 13, 2022 | 1:55 PM

कराची : सध्या पाकिस्तानमध्ये अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. आधी इम्रान खान यांना पंप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर पीटीआय पार्टीचे खासदार आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट आमिर लियाकत (Aamir Liaquat Hussain) यांच्या वैवाहीक जीवनाला सुरूंग लागताना दिसत आहे. लियाकत यांची तिसरी पत्नी सैयदा दानिया शाह (Syeda Dania Shah) यांनी त्यांच्याकडे तलाक मागितला आहे. सैयदा यांनी तलाक (तलाक घेण्याचा महिलांचा अधिकार) साठी अर्ज दाखल केला आहे. तसेच आमिर टीव्हीवर दिसतात तसे नाहीयेत. ते सैतानापेक्षाही भयंकर आहेत, असा आरोप सैयदा यांनी लगावला आहे. तसेच घटस्फोटापोटी सैयदा यांनी आमिर यांच्याकडून 11.5 कोटी रुपये, घर आणि दागिण्यांची मागणी केली होती. त्यानंतर आता लियाकत यांचा बेडरूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. लियाकतची तिसरी पत्नी दानिया शाह हिने हा व्हिडिओ लीक केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता लियाकत यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ (Controversy Videos) सोशल मीडियावर लीक झाल्याने सगळीकडे चर्चा सुरू आहे. तर लियाकतची तिसरी पत्नी दानिया शाह हिने आमिर लियाकतवर प्राणघातक हल्ला, तुरुंगात टाकणे आणि जबरदस्तीने न्यूड व्हिडिओ शूट करण्यापर्यंतचे गंभीर आरोप केले आहेत.

व्हिडिओमध्ये लियाकत न्यूड अवस्थेत

तर सोशल मीडियावर लीक झालेल्या या व्हिडिओमध्ये लियाकत न्यूड अवस्थेत दिसत आहे. बेडवर ड्रग्जही ठेवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लीक झालेल्या या व्हिडिओंवर लियाकतने ट्विट करत म्हटले आहे की, त्यांना न्यूड व्हिडिओंबाबत माझी भूमिका जाणून घ्यायची आहे. असे व्हिडीओ लीक होण्यामागे जे जबाबदार आहेत त्यांची भूमिका काय आहे, याचे उत्तर आहे. न्यायव्यवस्था कुठे आहे, प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाचे रक्षण करणे ज्याची जबाबदारी आहे, त्या न्यायव्यवस्थेने कोणतेही पाऊल का उचलले नाही? फेडरल इन्व्हेस्टिगेशन अॅथॉरिटीच्या सायबर क्राईम विंगने आतापर्यंत कोणतीही कारवाई का केली नाही?

सभ्य पद्धतीने पुढे जायचे आहे

ते म्हणाले की, जे व्यभिचार करतात ते चांगले असतात पण लग्न निवडणारे वाईट असतात. दानियाने जे केले ते निकाह सारखे पाक संबंध कलंकित करणारे आहे. लियाकत म्हणाले, या व्हिडिओंमध्ये असल्यामुळे लोक माझी चेष्टा करत आहेत. या व्हिडीओत एक महिला असती तर लिबरल असे वागले असते का? तसेच ते म्हणाले की, त्याला असा कोणताही व्हिडिओ शेअर करायचा नाही कारण त्याला सभ्य पद्धतीने पुढे जायचे आहे. दानियाने अल्लाहने निर्माण केलेल्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने लग्नाची गोपनीयता आणि विश्वास तोडला आहे.

पती-पत्नी हे एकमेकांच्या कपड्यांसारखे

कुराणच्या श्लोकाचा संदर्भ देत ते म्हणाले की, पती-पत्नी हे एकमेकांच्या कपड्यांसारखे आहेत आणि दानियाने या ड्रेसचे तुकडे केले आहेत. लियाकतने दानियाची मुलाखत घेत असलेल्या मीडिया पोर्टलला सांगितले की, मॉर्फिंग हे एक अतिशय लोकप्रिय तंत्र आहे, ज्याचा वापर कोणत्याही प्रकारच्या प्रचारासाठी केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

पतीच्या लीक व्हिडिओवर काय म्हणाली दानिया?

व्हिडिओ लीक केल्याच्या आरोपावर दानियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी कोणताही व्हिडिओ बनवला नाही. हा व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला आहे. मी त्यांच्यावर चिखलफेक केलेली नाही. त्याने मला कायदेशीररित्या घटस्फोट द्यावा अशी माझी इच्छा आहे. तर दानियाने आमिर लियाकतवर दारूसोबत ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच तिने लियाकतवर तिचे अॅडल्ट व्हिडीओ बनवल्याचा आरोपही केला आहे, जेणेकरून तो परदेशात काही लोकांना पाठवू शकेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें