पाकमध्ये 'भारतीय' समजून ज्याला मारहाण झाली, त्या पाकिस्तानी पायलटचा मृत्यू

इस्लामाबाद (पाकिस्तान) : भारतीय जवान समजून ज्याला पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांना बेदम मारहाण केली होती, त्या पाकिस्तानी विंग कमांडरचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाहजुद्दीन असे पाकिस्तानी विंग कमांडरचे नाव होते. एकीकडे पाकिस्तानातून मायदेशी परतलेल्या भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे, तर सीमेपलिकडे पाकिस्तानात त्यांच्याच नागरिकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या विंग कमांडर शाहजुद्दीन …

पाकमध्ये 'भारतीय' समजून ज्याला मारहाण झाली, त्या पाकिस्तानी पायलटचा मृत्यू

इस्लामाबाद (पाकिस्तान) : भारतीय जवान समजून ज्याला पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांना बेदम मारहाण केली होती, त्या पाकिस्तानी विंग कमांडरचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाहजुद्दीन असे पाकिस्तानी विंग कमांडरचे नाव होते. एकीकडे पाकिस्तानातून मायदेशी परतलेल्या भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे, तर सीमेपलिकडे पाकिस्तानात त्यांच्याच नागरिकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या विंग कमांडर शाहजुद्दीन यांच्यासाठी शोक व्यक्त केला जात आहे.

26 फेब्रावारीच्या पहाटे 3.30 वाजता भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारताच्या हल्ल्याने हवालदिल झालेल्या पाकिस्तानने वायूसेनेची 20 विमानं भारताच्या हद्दीत घुसवली होती. मात्र, भारताने या हवाई हल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला, तसे ते माघारी पळाले.

वाचा : पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?

यावेळी एफ-16 या विमानाला भारतीय जवानांनी पाडलं. मात्र, त्यातील पायलट असलेला विंग कमांडर शाहजुद्दीन याने पॅराशूटच्या मदतीने उडी घेतली आणि पाकव्याप्त काश्मीरच्या भूमीवर उतरला. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी मात्र शाहजुद्दीनला भारतीय पायलट समजून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेतच जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासठी नेण्यात आले. मात्र, तिथे शाहजुद्दीनचं निधन झालं.

ज्या प्रकारे भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे आजोबा, वडील यांनीही भारतीय सैन्यात सेवा केली आहे, तशी सेवा पाकिस्तानी विंग कमांडर शाहजुद्दीन यांच्या आजोबा आणि वडिलांनी पाकिस्तानी सैन्यात केली आहे. त्यामुळे शाहजुद्दीनच्या घरातूनच सैन्यीच शिकवण होती. शाहजुद्दीनचे वडील पाकिस्तानी वायूदलात एअर मार्शल होते. शाहजुद्दीनच्या वडिलांनाही कधीकाळी एफ-16 आणि मिराज या लढाऊ विमानं उडवली आहेत.

संबंधित बातम्या :

विंग कमांडर अभिनंदन यांचं BCCI कडून हटके स्वागत

ढाण्या वाघाची ग्रँड एण्ट्री! विंग कमांडर अभिनंदन पिस्तुलसह मायभूमीत!

प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द – Welcome Home Abhinandan

इकडे अभिनंदन यांना सोपवलं, तिकडे गोळीबारात 4 जवान शहीद

भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *