फेसबुकवर मैत्री, फोनवर बोलताना प्रेम, अखेर लग्न, पाकिस्तानच्या 23 वर्षीय अब्दुल्ला आणि 65 वर्षीय एरियानाची कहाणी

अब्‍दुल्‍ला पाकिस्‍तानचे आहेत तर महिला ही चेक रिपब्लिक येथे राहणारी आहे. पाकिस्तानच्या मीडियानुसार, या दोघांचं प्रेम प्रकरण हे फेसबुकवरुन सुरु झालं होतं.

फेसबुकवर मैत्री, फोनवर बोलताना प्रेम, अखेर लग्न, पाकिस्तानच्या 23 वर्षीय अब्दुल्ला आणि 65 वर्षीय एरियानाची कहाणी
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 12:59 PM

इस्लामाबाद : पाकिस्‍तानमध्ये सध्या एका लग्नाची मोठी चर्चा होत आहे. येथे 23 वर्षीय एका व्यक्तीने (Abdullah Marries 65 year Old Ariana) 65 वर्षांच्या एका महिलेसोबत लग्न केलं. या लग्नानंतर प्रत्येक ठिकाणी या लग्नाचीच चर्चा सुरु आहे. प्रत्येकाला हा प्रश्न पडला आहे की हे कसं झाले? अब्‍दुल्‍लाने 42 वर्ष मोठ्या महिलेसोबत का लग्न केलं. त्याचे घरचे कसे ऐकले? (Abdullah Marries 65 year Old Ariana)

अब्‍दुल्‍ला पाकिस्‍तानचे आहेत तर महिला ही चेक रिपब्लिक येथे राहणारी आहे. पाकिस्तानच्या मीडियानुसार, या दोघांचं प्रेम प्रकरण हे फेसबुकवरुन सुरु झालं होतं.

23 वर्षांचा अब्‍दुल्‍ला हा व्यवसायाने एक पेंटर आहे. त्याने नुकतंच चेक रिपब्लिकच्या एरियानासोबत लगीन गाठ बांधली. अब्‍दुल्‍ला गुंजरावाला हा वरपाल छात्‍ता येथील राहणारा आहे. त्याचं आणि एरियानाची मैत्री फेसबुकवरुन सुरु झाली. अब्‍दुल्‍लाने एरियानाला फ्रेंड रिक्‍वेस्‍टसोबत मेसेंजरवर मेसेज पाठवला होता. त्यानंतर दोघं फोनवर बोलायला लागले. एरियाना गेल्या एक वर्षापासून व्हिसासाठी प्रयत्न करत होती. पण, प्रत्येकवेळी तिचा व्हिसा रिजेक्ट व्हायचा.

पाकिस्‍तानच्या दूतावासची मदत

अब्‍दुल्‍लानेही व्हिसासाठी अर्ज दिला होता. पण, त्याचाही अर्ज रिजेक्ट करण्यात आला. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर आणि अनेक फोन कॉल्‍सनंतर एरियानाच्या देशातील पाकिस्‍तानी दूतावासने याची दखल घेतली. अब्‍दुल्‍ला अखेर एरियानाला भेटला. अब्‍दुल्‍लासोबत लग्न केल्यानंतर एरियानाने इस्‍लाम धर्म कुबूल केला. दोघांनी 3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी अखेर लग्न केलं.

अब्‍दुल्‍ला चेक रिपब्लिकमध्ये राहणार

लग्नानंतर दोघंही चेक रिपब्लिकमध्ये राहणार आहेत आणि अब्‍दुल्‍ला आता तिथेच त्याचं पेटिंगचं काम करेल. एरियाना एक रिटायर्ड स्‍कूल टीचर आहे. ती आपल्या पती अब्‍दुल्‍लाला इंग्रजी भाषा शिकण्यात मदत करणार आहे. पण, स्वत: त्यांनी उर्दू आणि पंजाबी भाषा शिकली. अब्‍दुल्‍लासाठी त्याच्या आई-वडिलांना लग्नासाठी मनवणे काही कठीण काम नव्हतं.

दोघेही सहज या लग्नाला तयार झाले आणि आनंदाने त्यांचं लग्न लावून दिलं. अब्‍दुल्‍ला यांच्यामते, त्यांचे आई-वडिल खूप सर्पोटिव्ह आहेत आणि एरियाना त्यांना आवडते. त्यामुळे त्यांना लग्नासाठी तयार करणे काही कठीण काम नव्हते (Abdullah Marries 65 year Old Ariana).

अब्‍दुल्‍लाला पिता व्हायचंय

आता अब्‍दुल्‍ला पिता होण्याचं स्वप्न पाहात आहे. सध्या तो यासाठी काय काय पर्याय आहेत याचा शोध घेत आहेय. एरियानाच्या वयामुळे डॉक्टरांनी तिला आई न होण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्‍तानचं गुंजरावाला शहर हे पंजाब प्रांततील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक शहर आहे. हे देशातील पाचवं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. 18 व्या शतकात हे शहर वसवण्यात आलं होतं.

Abdullah Marries 65 year Old Ariana

संबंधित बातम्या :

‘या मुर्खांना कुणी कामावर ठेवलं’, भारतीय कलाकारांच्या ट्विट मालिकेवर हॉलिवूड बरसलं

पाकिस्तानमध्ये आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणच्या बहादूर जवानांनी आपल्या साथीदारांना सोडवलं

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.