दहशतवादी मसूद अजहरच्या मुलाला आणि भावाला अटक

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:43 PM, 5 Mar 2019
दहशतवादी मसूद अजहरच्या मुलाला आणि भावाला अटक

इस्लामाबाद: भारताचा एअर स्ट्राईकनंतर हादरलेल्या पाकिस्तानने आता कारवाईला सुरुवात केली आहे. भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पुरावे दिल्यानंतर, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानातील 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा मुलगा, भाऊ मुफ्ती अब्दुल रौफसह (Mufti Abdur Rauf) 44 दहशतवाद्यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री हमाद अझर यांनी पत्रकार पुरिषदेत ही माहिती दिली.

वाचा: युद्धातील मृतदेह कोण आणि कसे मोजतात? पद्धत काय?

भारताने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला पुरावे अर्थात डोजियार सोपवलं होतं. शिवाय पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानवर जगभरातून दबाव आहे, त्यामुळे पाकिस्तानने दिखाव्यासाठी का असेना पण त्यांनी 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राईक करुन दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याबाबतचा नेमका आकडा समोर आला नसला, तरी पाकिस्तानला हादरा मात्र नक्कीच बसला आहे.

भारताच्या नौदलाचाही स्ट्राईक?

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पायलट प्रोजेक्ट झाला रिअल बाकी’ आहे, असा इशारा दिला होता. त्याचीच प्रचिती सीमेवर येत आहे. कारण भारताच्या एअर स्ट्राईकनंतर आता इंडियन नेव्हीनेही अटॅकला सुरुवात केली आहे का असा प्रश्न आहे. कारण पाकिस्तानी नौदलाने तसा दावा केला आहे. भारतीय पाणबुडी आपल्या हद्दीत घुसली होती, मात्र आम्ही त्यांना हुसकावून लावलं, असं पाकिस्तानी नौदलाने म्हटलं आहे.

2016 नंतर दुसऱ्यांदा भारतीय पाणबुडीने पाकिस्तानी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, असा दावा पाकिस्तानी नौदलाच्या प्रवक्त्याने केला.

संबंधित बातम्या 

आता पाकवर नेव्हीचा स्ट्राईक? भारतीय पाणबुडी घुसल्याचा पाकचा दावा 

मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला?   

युद्धातील मृतदेह कोण आणि कसे मोजतात? पद्धत काय?