‘या’ राष्ट्रपतींनाही मोदी जॅकेटची भुरळ !

  • Sachin Patil
  • Published On - 18:28 PM, 1 Nov 2018
'या' राष्ट्रपतींनाही मोदी जॅकेटची भुरळ !

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशासह परदेशात ही मोठ्या प्रमाणात आहे. कधी मोदींच्या भाषणांची चर्चा होते, तर कधी मोदींनी घातलेल्या जॅकेटची.  आता मोदींच्या जॅकेटची भुरळ दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन यांना देखील पडली आहे. इतकंच नव्हेतर हल्ली राष्ट्रपती मून ऑफिसमध्येही ‘मोदी जॅकेट’ घालून जात आहेत.

याबाबतची माहिती स्वत: दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी बुधवारी 31 ऑक्टोबर रोजी ट्वीटरवरून दिली. यावेळी मून यांनी एका पाठोपाठ दोन ट्वीट करत मोदींचा उल्लेख केला आहे.

ट्वीटमध्ये मून म्हणाले की, भारत भेटीदरम्यान, मोदींना भेटल्यावर मी त्यांच्या जॅकेटची प्रशंसा केली होती, त्यानंतर मोदींनी माझे आभार ही मानले.

तसेच, मोदींनी मला हे जॅकेट आवडले का? असं ही विचारलं होतं.  मात्र, त्यावेळी हे जॅकेट भारतात मोदी जॅकेटनं प्रसिद्घ आहे, याची मला कल्पना नव्हती. आता हेच मोदी जॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट भारतातून पाठवल्यानं मी भारावलो आहे.

विशेष  म्हणजे, मोदींनी पाठवलेल्या जॅकेटवर मून यांनी मोदी जॅकेट असं लिहलं असून यापुढे हे दक्षिण कोरियाच्या बाजार पेठेत सर्वत्र उपलब्ध असेल. असं ट्विट दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन यांनी केलं.

दिवाळीच्या मुहूर्तावर दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-एन पत्नीसह भारत दौऱ्यावर येणार आहे.