मोदींचा अमेरिका दौरा : भाषण ऐकण्यासाठी 40000 जागा आत्ताच बूक

दक्षिण-पश्चिम अमेरिकन राज्यात सर्वसाधारणपणे वापरलं जाणाऱ्या 'How do you do?' या वाक्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच Howdy या नावानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

मोदींचा अमेरिका दौरा : भाषण ऐकण्यासाठी 40000 जागा आत्ताच बूक
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 10:20 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय समुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची (PM Modi’s US Visit) अतुरतेने वाट पाहतोय. कारण, “Howdy, Modi!” या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 40 हजार जणांनी नोंदणी केली आहे. पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेसाठी अमेरिका दौऱ्यावर (PM Modi’s US Visit) जातील, त्यावेळी ते 22 सप्टेंबरला भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. दक्षिण-पश्चिम अमेरिकन राज्यात सर्वसाधारणपणे वापरलं जाणाऱ्या ‘How do you do?’ या वाक्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच Howdy या नावानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

मोदींच्या कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत आहे. पण नोंदणी अनिवार्य करण्यात आहे, ज्याचे पास सध्या सार्वजनिक आहेत, अशी माहिती हॉस्टनमधील टेक्सास इंडिया फोरमने सांगितलं. हॉस्टन हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय चौथं शहर आहे. एनआरजी फुटबॉल मैदानावर मोदींच्या कार्यक्रमासाठी 50 हजार भारतीय समुदाय उपस्थित असेल, अशी माहिती आयोजकांनी दिली.

हॉस्टनमध्येही मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय राहतो. हॉस्टनच्या महापौरांनीही आपण मोदींच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय. अमेरिकन भारतीयांचं घर असलेल्या हॉस्टनमध्ये मोदींचं स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया महापौर सीलवेस्टर टर्नर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 39 हजार लोकांनी पास घेतले आहेत. नियोजनासाठी एक हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक काम करत आहेत, तर 650 स्वागतोत्सुक संस्था आहेत, अशी माहिती टेक्सास इंडिया फोरमने दिली.

कार्यक्रमाचे समन्वयक जुगल मुलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या भाषणापूर्वी ‘Shared Dreams, Bright Futures’ या थीमवर संस्कृतीक कार्यक्रम होईल, ज्यात अमेरिकन भारतीयांनी अमेरिकेच्या विकासात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला जाईल. संपूर्ण हॉस्टन शहराने या कार्यक्रमाला उपस्थित राहून टेक्सास-भारतीय संबंधांचे साक्षीदार व्हावं, असं आयोजकांनी म्हटलंय.

यापूर्वी मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच अमेरिका दौऱ्यात अमेरिकेतील भारतीय समुदायाला संबोधित केलं होतं. 2014 मध्ये न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअरला झालेल्या भाषणाची जगभर चर्चा झाली होती. मोदींचं अमेरिकेत जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यानंतर मोदींनी अमेरिकेत अनेकदा भारतीय समुदायाला संबोधित केलं आणि भारताच्या विकासात योगदान देण्याचं आवाहन केलं.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.