आखाती देशात युद्धाची शक्यता, इराणमध्ये मशिदीवर लाल झेंडा, अमेरिकेचं ड्रोनही पाडलं

इराणने अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर कोममधील जमकरान मशिदीवर लाल झेंडा फडकावला. याचा तेथील अर्थ युद्धाची घोषणा आणि बलिदानाची तयारी असा लावला जातो.

आखाती देशात युद्धाची शक्यता, इराणमध्ये मशिदीवर लाल झेंडा, अमेरिकेचं ड्रोनही पाडलं

तेहरान (इराण) : अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत चालला आहे. अमेरिकेने केलेल्या सैन्य कारवाईनंतर आता इराणने देखील अमेरिकेचे ड्रोन पाडले आहे. ही कारवाई अनबर प्रांतात करण्यात आली. इराणच्या पीएमएफ निमलष्करी दलाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे इराणने अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर कोममधील जमकरान मशिदीवर लाल झेंडा फडकावला. याचा तेथील अर्थ युद्धाची घोषणा आणि बलिदानाची तयारी असा लावला जातो. त्यामुळे आखाती देशांमध्ये मोठं युद्ध सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Possibility of Big war in golf countries).


इराणने पाडलेल्या अमेरिकेच्या ड्रोनची छायाचित्रे देखील समोर आली आहेत. यात ड्रोनचे तुकडे तुकडे झालेले पाहायला मिळत आहेत. शनिवारी (4 जानेवारी) अमेरिकन ड्रोन इराणच्या अरबन प्रांतात उडताना दिसला. त्यानंतर इराण सैन्याने तात्काळ कारवाई केली.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला. ट्रम्प म्हणाले, “इराणमधील 52 ठिकाणांना अमेरिकेने लक्ष्य केलं आहे. यातील अनेक ठिकाणं इराण आणि इराकच्या संस्कृतीसाठी महत्त्वाची ठिकाणं आहेत. जर इराणने कोणत्याही अमेरिकी व्यक्तीवर किंवा अमेरिकेच्या संपत्तीवर हल्ला केला, तर अमेरिका या ठिकाणांना तात्काळ उद्ध्वस्त करेल.”

आम्हाला इराणच्या अडचणी वाढवायच्या नाहीत, पण अशा कारवाईनंतर लवकरच इराणसाठी अडचणी वाढतील. इराण अमेरिकेच्या साधन संपत्तीला लक्ष्य करण्याचा विचार करत आहे. इराण त्यांच्या दहशतवादी नेत्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची गोष्ट करत आहेत. मात्र, त्या नेत्याने अनेक अमेरिकन लोकांना जखमी केलं आहे आणि मारलं आहे, असाही आरोप ट्रम्प यांनी केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *