पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, पेट्रोल-डिझेलपेक्षा दुधाची किंमत जास्त

पाकिस्तानमध्ये (Pakistan) महागाईने (Inflation) तेथील सामान्य जनता चांगलीच होरपळून निघत आहे. येथे केवळ अन्नधान्याच्या किमतीच नाही, तर पेट्रोल-डिझेलसोबत दुधाच्या किमती (Price of Milk) देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, पेट्रोल-डिझेलपेक्षा दुधाची किंमत जास्त

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानमध्ये (Pakistan) महागाईने (Inflation) तेथील सामान्य जनता चांगलीच होरपळून निघत आहे. येथे केवळ अन्नधान्याच्या किमतीच नाही, तर पेट्रोल-डिझेलसोबत दुधाच्या किमती (Price of Milk) देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मागील महिन्यात पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत (Price of Petrol) 117.83 रुपये (पाकिस्तानी रुपया) प्रति लिटरपर्यंत, तर डिझेलची किंमत (Price of Diesel) 132.47 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचली होती. विशेष म्हणजे दुधाच्या किमतीने पेट्रोल डिझेललाही मागे टाकले. सध्या पाकिस्तानमध्ये दुधाची किंमत 140 रुपये प्रति लिटरपर्यंत गेली आहे.

पाकिस्तानमध्ये दैनंदिन वापरातील दुधासारख्या आवश्यक पदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. याचा थेट परिणा मुहर्रम सणावरही झाला आहे. कराची आणि सिंध प्रांतासारख्या पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये दुधाची किंमत 140 रुपये झाली आहे.
पाकिस्तानचे वृत्तपत्र एक्सप्रेस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ‘डेअरी माफिया’कडून ऐन मुहर्रमच्या काळात दुधाच्या किमती वाढवून नागरिकांची लूट सुरू आहे. मोहर्रममध्ये प्रत्येक घरात दुधाचा सरबत, खीर असे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे दुधाची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेऊन दुध विक्रेत्यांनी दुधाच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे.

नागरिकांच्या रोषाला कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीत काहीशी कपात केली आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे 4.59 रुपये आणि 5.33 रुपये कपात करण्यात आली आहे. असं असलं तरी अजूनही पेट्रोल-डिझेलच्या किमती अनुक्रमे 113.24 रुपये आणि 127.24 रुपये आहेत.

दुधाबाबत पाकिस्तान सरकारने जी किंमत निश्चित केली आहे तीही काही कमी नाही. पाकिस्तान सरकारने प्रतिलिटर दुधाची किंमत 94 रुपये निश्चित केली आहे. असं असलं तरी नागरिकांना प्रतिलिटर दुधासाठी बाजारात 110 रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागत आहे. आता मोहर्रममध्ये हीच किंमत 140 पर्यंत गेली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *