आधी कोरोना संसर्गाची अचूक भविष्यवाणी, आता त्याच भविष्यवेत्याने वर्तवलं 2021 मधील नव्या फ्लूचं भाकीत

औजुला मानसशास्त्रज्ञाने पुढच्या वर्षीसाठी एक मोठी भविष्यवाणी केली. (Corona epidemic Nicolas Aujula )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:06 PM, 23 Nov 2020

नवी दिल्लीः 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी त्रासदायक ठरलं. कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) जगभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अशा युगाची कोणीही कल्पनाही केली नव्हती. रोलर कोस्टर राइडसारखे या वर्षातील चढ-उतार थांबण्याचे नाव घेत नव्हते. वर्ष जस जसं संपुष्टात येत आहे, तस तसे प्रत्येक जण पुढच्या वर्षांकडे आशेने पाहत आहे. सन 2020 मध्ये लोक जीवघेण्या साथीच्या रोगाशी लढा देत आहेत. यापूर्वी आग, वादळ, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या दोन ते चार घटना घडल्या होत्या. (Psychic Who Predicted Corona Has Now Told Which Flu Will Come In 2021 All This Could Happen Next Year)

दरम्यान, निकोलस औजुला (Nicolas Aujula) नावाच्या मानसशास्त्रज्ञाने पुढच्या वर्षात प्रवेश करण्यापूर्वीच एक मोठी भविष्यवाणी केली आहे. यापूर्वीही औजुलाने कोरोना महामारीचा अंदाज वर्तविण्याचा दावाही केला होता. 2021 वर्ष सुरू होण्यापूर्वी निकोलस औजुला यांनी बर्‍याच नवीन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा केला होता. (Psychic Who Predicted Corona Has Now Told Which Flu Will Come In 2021 All This Could Happen Next Year)

वर्ष 2021 साठी निकोलस औजुलाच्या प्रमुख भविष्यवाणी

1. नव्या वर्षात जगभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू राहतील आणि अशांततेचे वातावरण कायम राहील. पुढील दोन ते तीन वर्षे हे सर्व सुरूच राहील.
2. याबरोबरच त्यांनी ‘पिग फ्लू’ या आजाराबद्दलही सांगितले आहे. हा विषाणू इतर कोणत्याही विषाणूसारखा दिसत नाही, परंतु तरीही तो संपूर्ण जगाला त्रासदायक ठरेल.
3. आपल्या भविष्यवाणीत एका मोठ्या नेत्याच्या हत्येबद्दलही औजुलानं सांगितलं आहे.  परंतु कोणत्या नेत्याची हत्या होणार, याबाबत त्यांनी सांगितले नाही.
4. एक मोठं सेक्स स्कँडल जागतिक शिखर संमेलनावर परिणाम करू शकते. दक्षिण युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका या राजकारण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
5. औजुलाने पुढच्या वर्षी ज्वालामुखीचा उद्रेक आणि हवामानातील मोठ्या बदलांचा अंदाज देखील वर्तविला आहे.
6. याबरोबरच औजुलाने नताली पोर्टमॅन आणि किम कर्दाशियन यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा अंदाज वर्तविला आहे आणि टॉम क्रूझलाही हृदयविकाराचा धोका असल्याचं सांगितलं आहे.

पुढील वर्षासाठीच्या या काही प्रमुख भविष्यवाण्या आहेत. त्याच वेळी निकोलस औजुलाला असा विश्वास आहे की, तो त्याच्या पुढच्या आयुष्यातील अनेक दृश्य पाहू शकतो. त्याने अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पराभवाची कल्पनाही केली होती. जागतिक विरोध हा ब्लॅक लाईव्हस मॅटर चळवळीशी जोडलेला राहणार असल्याचं मतही त्याने व्यक्त केले आहे. (Psychic Who Predicted Corona Has Now Told Which Flu Will Come In 2021 All This Could Happen Next Year)

(Psychic Who Predicted Corona Has Now Told Which Flu Will Come In 2021 All This Could Happen Next Year)

संबंधित बातम्या

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

कोरोना लसीची चाचणी घेतलेल्या स्वयंसेवकाचा अनुभव, पहिल्या इंजेक्शनवेळी वेदना आणि तापाचा करावा लागला सामना!