Pulwama Attack: सौदीच्या राजपुत्राने पाक दौरा टाळला

अबू धाबी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद जगभरात दिसत आहे. भारताने जोर दिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सौदी अरबचे राजपुत्र (Crown Prince ) मोहम्मद बिन सलमान  (Mohammed Bin Salman) हे दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांनी हा दौरा एक दिवसांचाच केला आहे.  मोहम्मद बिन सलमान हे नियोजित वेळेनुसार आज …

Pulwama Attack: सौदीच्या राजपुत्राने पाक दौरा टाळला

अबू धाबी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद जगभरात दिसत आहे. भारताने जोर दिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सौदी अरबचे राजपुत्र (Crown Prince ) मोहम्मद बिन सलमान  (Mohammed Bin Salman) हे दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांनी हा दौरा एक दिवसांचाच केला आहे.  मोहम्मद बिन सलमान हे नियोजित वेळेनुसार आज म्हणजेच 16 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये जाणार होते. मात्र आता ते 17 फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये जाणार आहेत.

दोन दिवसांच्या नियोजित दौऱ्यामुळे सौदीचे राजपुत्र पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र भारतातील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी आपली आजची बैठक रद्द करुन पुढे ढकलली.  पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर अचानक सौदीच्या राजपुत्रांनी हा निर्णय घेतला. ते पहिल्यांदाच पाकिस्तना दौऱ्यवार जात होते. याआधी सौदी अरेबियाने पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेधही व्यक्त केला होता.  पुलवामा हल्ल्यात 37 जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हा आत्मघातली हल्ला केला.

दुसरीकडे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या भेटीबाबत खुलासा केलेला नाही. पाकिस्तानातील दैनिक डॉनच्या वृत्तामध्ये, दोन्ही देशांतील द्विपक्षीय मुलाखत पहिल्यासारखी व्यवस्थित पार पडणार असल्याचे म्हटलं आहे.

सौदीचे राजपुत्र येणार असल्याने पाकिस्तानमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हॉटेल बुकिंग करण्यात आले होते. याशिवाय इस्लमाबादमध्ये राजपुत्र सलमान यांचे मोठे बॅनर लावण्यात आले होते. मात्र राजपुत्र सलमान यांनी एक दिवसाचा दौरा रद्द केल्याने सध्या पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात नाराजी दिसत आहे. मात्र पाकिस्तानकडून यावर स्पष्ट उत्तर मिळत नाही.

सौदी अरबने हल्ल्याचा निषेध करत भारताला दहशतवादविरोधात पूर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगितले. तसंच हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी दु:ख व्यक्त केले. राजपुत्र सलमान हे पाकिस्तानचा दौरा झाल्यानंतर 19 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर  येणार आहेत. भारतासाठीही त्यांचा हा पहिला दौरा असेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *