रडारने फोटोद्वारे पुरावे दिले, एअर स्ट्राईकमध्ये जैशच्या 4 इमारती जमीनदोस्त

नवी दिल्ली: भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरसह बालाकोट इथं दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे मदरसे तलीम-उल-कुरानमधील चार इमारती जमीनदोस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाने हे वृत्त दिलं आहे. त्याआधी आंतरराष्ट्रीय दैनिकांनी भारताच्या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला होता. मात्र इंडियन एक्स्प्रेसने …

रडारने फोटोद्वारे पुरावे दिले, एअर स्ट्राईकमध्ये जैशच्या 4 इमारती जमीनदोस्त

नवी दिल्ली: भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरसह बालाकोट इथं दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे मदरसे तलीम-उल-कुरानमधील चार इमारती जमीनदोस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. इंडियन एक्स्प्रेस या दैनिकाने हे वृत्त दिलं आहे. त्याआधी आंतरराष्ट्रीय दैनिकांनी भारताच्या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला होता. मात्र इंडियन एक्स्प्रेसने आज नवा रिपोर्ट समोर आणला आहे. तांत्रिक बाबी, सीमेवरील धुमश्चक्री आणि गुप्त माहितीच्या अभावामुळे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर येणं शक्य नाही. मिराज -2000 या विमानांनी मुजफ्फराबाद, चकोटी आणि बालाकोटमध्ये 1 हजार किलोचा बॉम्ब टाकला होता. या हल्ल्यात शेकडो अतिरेकी ठार झाल्याचं सांगण्यात येत होतं.

गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने केलेले दावे

सूत्रांच्या मते, “गुप्तचर यंत्रणांकडे सिंथेटिक अपार्चर रडार (SAR) चे फोटो आहेत. या फोटोमध्ये इमारतीला निशाणा बनवण्यात आल्याचं स्पष्ट दिसतं. मिराज-2000 लढाऊ विमानांनी पाच S-2000 प्रीसीशन गायडेड म्युनिशन (PGM) डागले होते. पीजीएम हा एक स्मार्ट बॉम्ब असतो, जो विशिष्ट टार्गेट निवडून फेकला जातो. 

ज्या इमारतींवर बॉम्ब टाकण्यात आले, त्या मदरशांच्या परिसरातच होत्या. हे मदरसे जैश ए मोहम्मदकडूनच चालवले जात होते. पाकिस्ताननेही असे हल्ले झाल्याचं मान्य केलं होतं, मात्र कोणतंही नुकसान झालं नसल्याचं म्हटलं होतं. तसंच इथे कोणतेही दहशतवादी कॅम्प नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.

सध्या अधिकाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत की, भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने मदरसे सील का केले आहेत? पाकिस्तानी सैन्याने बॉम्ब पडलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मीडियाला नेलं, मात्र त्या शेजारीच असलेल्या मदरशाकडे पत्रकारांना का जाऊ दिलं नाही?

रडारद्वारे मिळालेल्या पुराव्यांवरुन त्या इमारतीचा वापर गेस्टहाऊस म्हणून केला जात असल्याचं समोर आलं. इथे जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ राहात होता. एल आकाराच्या या इमारतीत राहणाऱ्या लोकांना दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं जात होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, मदरशात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका दोन मजली इमारतीत ठेवलं जात होतं. दुसऱ्या इमारतीत दहशवादी ट्रेनिंग घेणारे हल्लेखोर राहात होते.

संबंधित बातम्या 

पाकिस्तानातून अभिनंदन यांना घेऊन येणारी ही महिला कोण?  

विंग कमांडर अभिनंदन यांचं BCCI कडून हटके स्वागत  

प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द – Welcome Home Abhinandan  

भारतात येण्यापूर्वी अभिनंदन यांची बळजबरी मुलाखत, छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर  

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *