अरे देवा! प्रसिद्ध रॅपर लिल वेनचं ब्रेकअप; ट्रम्प यांना पाठिंबा दिल्याने गर्लफ्रेंड नाराज!

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून येतील की नाही माहीत नाही. पण ट्रम्प यांच्यामुळे एका जोडप्याच्या नात्यात मात्र वितुष्ट आलं आहे. ट्रम्प यांना पाठिंबा दिल्याने प्रसिद्ध रॅपर लिल वेन याच्याशी त्याच्या गर्लफ्रेंडने चक्क ब्रेकअप केलं आहे.

अरे देवा! प्रसिद्ध रॅपर लिल वेनचं ब्रेकअप; ट्रम्प यांना पाठिंबा दिल्याने गर्लफ्रेंड नाराज!
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 9:09 PM

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून येतील की नाही माहीत नाही. पण ट्रम्प यांच्यामुळे एका जोडप्याच्या नात्यात मात्र वितुष्ट आलं आहे. ट्रम्प यांना पाठिंबा दिल्याने प्रसिद्ध रॅपर लिल वेन याच्याशी त्याच्या गर्लफ्रेंडने चक्क ब्रेकअप केलं आहे. (rapper Lil Wayne’s Girlfriend Breaks Up With Him )

अमेरिकेतील प्रसिद्ध रॅपर लिल वेन याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन केलं होतं. त्यामुळे नाराज झालेली त्याची गर्लफ्रेंड डेनिसने त्याच्याशी ब्रेकअप केलं आहे. 29 ऑक्टोबर रोजी वेनने ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने ट्रम्प यांच्याशी प्लेटिनम प्लानबाबत चर्चा केली होती. या प्लाननुसार कृष्णवर्णीय लोकांसाठी 500 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करायची होती. या भेटीचे फोटोही व्हायरल झाले होते.

मात्र, या भेटीमुळे डेनिस चांगलीच भडकली. तिने तात्काळ वेनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने स्वत:चं इन्स्टा अकाऊंटही डिलिट केलं. अकाऊंट डिलिट करण्यापूर्वी तिने एक पोस्ट केली होती. कधी कधी प्रेम पुरेसं नसतं, अशी भावूक पोस्ट तिने केली होती. त्यानंतर डेनिस आणि वेनमध्ये ब्रेकअप होणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

34 वर्षीय डेनिस मॉडल असून कुवेत आणि पुओर्तीशी संबंधित आहे. तिचा जन्म अमेरिकेच्या मियामी येथे झालेला आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तिंसोबत तिने काम केलं आहे. या वर्षापासून डेनिसने वेनला डेट करायला सुरुवात केली होती. या दोघांची सोशल मीडियावर अनेक फोटोही व्हायर झाले होते. वेननेही डेनिसचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

वेन यांच्यापूर्वी काही कृष्णवर्णीय कलाकारांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. त्यात किम कार्दशियनचा पती संगीतकार केनी वेस्टचाही समावेश आहे. तर, हॉलिवूड सुपरस्टार जेनिफर अॅनिस्टन, ब्रॅड पिट, रॉबर्ट डि नीरो, लेडी गागा आणि मॉर्गन फ्रिमेन यांनी जो बायडन यांना पाठिंबा दर्शविला आहे. (rapper Lil Wayne’s Girlfriend Breaks Up With Him )

संबंधित बातम्या:

ट्विटर नंतर फेसबुकचाही डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा ठपका

जगातील सर्वात वेगळ्या मंत्रिमंडळाची निवड, न्यूझीलंडच्या जेसिंडा मंत्रिमंडळातील थक्क करणाऱ्या 9 गोष्टी

(rapper Lil Wayne’s Girlfriend Breaks Up With Him )

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.