प्रत्येकाला एक, दोन नव्हे तर 35 लाखांचा बोनस, हातात आलेला चेक पाहून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी

एका रिअल इस्टेट कंपनीने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला जवळपास 35 लाख रुपये बोनस दिला (real estate company bonus) आहे

प्रत्येकाला एक, दोन नव्हे तर 35 लाखांचा बोनस, हातात आलेला चेक पाहून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी

न्यूयॉर्क (अमेरिका) : एका रिअल इस्टेट कंपनीने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक, दोन नव्हे तर तब्बल 35 लाख रुपये बोनस दिला (real estate company bonus) आहे. कंपनीतील 198 कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी कंपनीतर्फे 71 कोटी रुपयांचा खर्च केला (real estate company bonus) आहे. अमेरिकेतील एका कंपनीने हा बोनस दिला आहे. बोनसचा चेक घेण्यासाठी गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू (real estate company bonus) तरळले.

अमेरिकेतील बाल्टीमोरमधील सेंट जॉन प्रॉपर्टीज नावाची कंपनी आहे. या कंपनीने एका हॉलिडे पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत या कंपनीने बोनस देण्याची घोषणा केली. न्यूयॉर्क पोस्ट या वृत्तपत्राने याबाबतची माहिती दिली.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळानुसार बोनस मिळणार आहे. पण यातील अनेक कर्मचाऱ्यांना 35 लाख रुपये मिळणार (real estate company bonus) आहेत.

यंदाच्या वर्षी कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे कंपनीला प्रत्येक कर्मचाऱ्याला 35 लाख रुपयांचा बोनस देणे शक्य झाले आहे. अमेरिकेतील 8 राज्यात या कंपनीने ऑफिस, रिटेल स्टोअर आणि गोदामासाठी 2 कोटी चौरस फूटची घर तयार केली आहेत. अशी माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनीकडून नुकतंच याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही एखाद्याचे आयुष्य बदलणारी गोष्ट आहे असे या व्हिडीओमध्ये अकाऊंट्स स्पेशलिस्ट डेनिएल वेलेन्जिया यांनी म्हटलं आहे. डेनिएल वेलेन्जिया या कंपनीत गेल्या 19 वर्षांपासून काम (real estate company bonus) करतात.

विशेष म्हणजे नियमित मिळणाऱ्या बोनसव्यतिरिक्त कंपनीने हा बोनस दिला आहे. या बोनसची घोषणा कंपनीने फाऊंडर आणि चेअरमॅन एडवर्ड सेंट जॉन यांनी सांगितले की, मला कंपनीचे यश सेलिब्रेट करायचे होते. त्यासाठी ज्यांनी काम केले, त्याच्यासाठी मला काही तरी करायचे होते. असे ते म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *