रशियाच्या कोरोना लसीची फक्त 38 जणांवर चाचणी, 144 प्रकारचे साईड इफेक्ट, ब्रिटनच्या वृत्तपत्राचा दावा

डेली मेलच्या आरोपानंतर रशियानं ज्या लॅबमध्ये कोरोनाची लस विकसित झाली, त्या लॅबचा व्हिडीओ जारी (Russia Corona Vaccine side effect) केला.

रशियाच्या कोरोना लसीची फक्त 38 जणांवर चाचणी, 144 प्रकारचे साईड इफेक्ट, ब्रिटनच्या वृत्तपत्राचा दावा

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहा:कार पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जग लसीचं वाट पाहतं आहे. कोरोनाची लस सप्टेंबरला येणार की डिसेंबरला, कुणाची लस खरी, कुणाची लस खोटी, लस आली म्हणजे कोरोना संपणार का, असे प्रश्न अनेकदा विचारले जात आहेत. (Russia Corona Vaccine side effect)

याच प्रश्नांच्या या गुंत्यात 12 ऑगस्टची तारीख उजाडली. याच दिवशी रशियानं जगातील कोरोनाची पहिली लस शोधल्याची घोषणा केली. त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढ्यात माणसांच्या हाती रामबाण हत्यार सापडल्याने कौतुकही झालं. मात्र या घोषणेनंतरचा आनंद संपत नाही, तोच ब्रिटनच्या डेली मेलनं खळबळजनक दावा केला आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रशियानं फक्त 38 लोकांवर कोरोनाची चाचणी केली. ही चाचणी फक्त 42 दिवस चालली. त्यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या 38 लोकांना लस दिली गेली. त्यांना 144 प्रकारचे साईड इफेक्ट झाले, हा दावा राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या दाव्याला खोटा ठरवतो आहे. कारण, पुतीन यांनी खुद्द स्वतःच्या मुलीचा दाखल देऊन लस सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं.

डेली मेलच्या आरोपानंतर रशियानं ज्या लॅबमध्ये कोरोनाची लस विकसित झाली, त्या लॅबचा व्हिडीओ जारी केला. हीच तिच लॅब आहे. ज्या लॅबमध्ये जगातली पहिली कोरोना लस तयार झाल्याचा दावा केला आहे. याच डॉक्टरांनी शोधलेल्या लसीला रशियानं ‘स्पुतनिक’ नाव दिलं आहे

ज्या वेगानं रशियानं लस शोधली, तो एक रेकॉर्ड आहे. कारण, आतापर्यंत सर्वात कमी वेळेत फक्त इबोला विषाणूची लस शोधली गेली आहे. कमी वेळ म्हणजे नेमका किती, तर तब्बल 4 वर्ष आणि जर रशियाचा दावा खरा मानला, तर रशियानं फक्त साडे तीन महिन्यात कोरोनाची लस शोधली आहे. म्हणूनच ब्रिटनसारख्या देशांना रशियाच्या संशोधनावर शंका आहे.

मात्र रशियाला लसीची खात्री नसेल, तर ते स्वतःच्या जनतेला लस का देतील, रशियासारख्या बलाढ्य देशाचे थेट राष्ट्रपतीचं लसीची घोषणा का करतील आणि महत्वाचं म्हणजे खुद्द पुतीन स्वतःच्या मुलीला लस का टोचून घेतील, या सर्व प्रश्नांमुळे रशियाच्या लसीवर होणारे आरोप कमकुवत होतात. त्यामुळे येणाऱ्या दीड ते दोन महिन्यात रशियात काय होतं, रशियाचा कोरोना ग्राफ खाली घसरतो का, या प्रश्नांच्या उत्तरांवरुनच रशियाच्या लसीचं खरं-खोटं बाहेर पडेल. (Russia Corona Vaccine side effect)

संबंधित बातम्या : 

Russia Corona Vaccine | राष्ट्रपती पुतिन यांच्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा, रशियाची कोरोना लस परिणामकारक?

रशियाची कोरोना लस Sputnik V भारतात येण्यास वेळ लागण्याची शक्यता, नेमकं कारण काय?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *