चोरी झालेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी 5 लाखाचं बक्षीस, विमानाने संपूर्ण शहरात शोधाशोध

एका महिलेने आपल्या कुत्र्याला शोधण्यासाठी 5 लाख रुपये बक्षिसाची घोषणा (Bring Jackson Home) केली आहे. एमिली टेलरेमो असे या महिलेचे नाव आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:51 PM, 20 Dec 2019
चोरी झालेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी 5 लाखाचं बक्षीस, विमानाने संपूर्ण शहरात शोधाशोध

वॉशिंग्टन (United States) : एका महिलेने आपल्या कुत्र्याला शोधण्यासाठी 5 लाख रुपये बक्षिसाची घोषणा (Bring Jackson Home) केली आहे. एमिली टेलरेमो असे या महिलेचे नाव आहे. एमिली ही कॅलिफॉर्नियातील सॅन फ्रॅन्सिसको शहरात राहते. एमिलीने जॅकसन या पाच वर्षाच्या कुत्र्याला शोधण्यासाठी हे बक्षीस जाहीर केले आहे. NDTV.Com याबाबतचे वृत्त दिलं आहे.

NDTV.Com ने दिलेल्या माहितीनुसार, एमिली गेल्या आठवड्यात एका किराणा मालाच्या दुकानात गेली होती. त्यावेळी निळ्या डोळ्यांचा ऑस्ट्रेलियन शेफर्ड प्रकारातील तिचा कुत्रा चोरी झाला. यानंतर एमिलीने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबतची माहिती (Bring Jackson Home) दिली.

एमिलीच्या चोरी झालेल्या कुत्र्याचे नाव जॅक्सन आहे. जॅक्सन हा बर्नाल हाइट्सच्या बाजूला असलेल्या एका किराणा मालाच्या दुकानातून चोरी झाला. यावेळी दुकानाचे सीसीटिव्ही बघितला असता, एक जॅकेट घातलेला व्यक्ती जॅक्सनच्या जवळ येताना दिसत आहे.

विशेष म्हणजे एमिलीने कुत्र्याला शोधण्यासाठी एक विमानही भाड्याने घेतले. त्या विमानतून तिने संपूर्ण शहरात जॅक्सनचा शोध घेतला. या विमानाचे भाडे जवळपास 85 हजार रुपये आहे. एवढंच नव्हे, तर महिलेने कुत्र्याला शोधण्यासाठी एक वेबसाईटही बनवली. www.bringjacksonhome.com असे या वेबसाईटचे नाव आहे. यावर जॅक्सनबाबतची माहिती देणाऱ्याला 7000 डॉलर म्हणजे 5 लाख रुपये मिळतील अशी जाहिरात तयार केली. ही जाहिरात तिने त्या विमानालाही (Bring Jackson Home) लावली.


दरम्यान या कुत्र्याचे वजन 13 किलो आहे. तसेच या कुत्र्याला काळ्या, सफेद आणि ग्रे रंगाची केस आहेत. तर त्याचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. या महिलेने या कुत्र्याच्या नावे टिंडरवर अकाऊंट बनवले आहे. तसेच या वेबसाईटवर Go Found me असे एक सेक्शन तयार करण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत 7 हजार रुपयांची रक्कम जमा झाली असून ही रक्कम डॉग रेस्क्यू टीमला देण्यात येणार आहे.