इम्रान खानची इज्जत काढणाऱ्या अफगाणी भाईजानचा दुसरा व्हिडीओ

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रत्युउत्तराच्या इशाऱ्यानंतर, त्यांची खिल्ली उडवणाऱ्या अफगाणी नागरिकाने, आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या भारतीय वायूसेनेचे बहादूर पायलट अभिनंदन वर्धमान (Abhinandan return) हे पाकिस्तानातून  भारताच्या वाटेवर आहेत. आज ते भारतात येत आहेत. त्यांच्या शौर्याला केवळ भारतीयच नाही तर अफगाणिस्तानातील नागरिकही सलाम करत आहेत. त्याचवेळी ते पाकिस्तानची खिल्लीही …

इम्रान खानची इज्जत काढणाऱ्या अफगाणी भाईजानचा दुसरा व्हिडीओ

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रत्युउत्तराच्या इशाऱ्यानंतर, त्यांची खिल्ली उडवणाऱ्या अफगाणी नागरिकाने, आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या भारतीय वायूसेनेचे बहादूर पायलट अभिनंदन वर्धमान (Abhinandan return) हे पाकिस्तानातून  भारताच्या वाटेवर आहेत. आज ते भारतात येत आहेत. त्यांच्या शौर्याला केवळ भारतीयच नाही तर अफगाणिस्तानातील नागरिकही सलाम करत आहेत. त्याचवेळी ते पाकिस्तानची खिल्लीही उडवत आहेत.

हसत हसत पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या ‘अफगानी भाईजानने’ (AFGHAN BHAIJAAN,) आणखी एक व्हिडीओ अपलोड केला आहे. मागील व्हिडीओत पाकिस्तानला जोरदार जोडे लगावणाऱ्या ‘अफगानी भाईजानने’ यावेळी मोलाचा सल्ला दिला. तसंच विंग कमांडर अभिनंदन यांना सलाम केला.

वाचा: इम्रान खानची भारताला धमकी, अफगाणी नागरिकांनी पाकची अब्रू काढली

या व्हिडीओ ‘अफगानी भाईजान’ म्हणतो, “जो आपलं शीर न झुकवता पाकिस्तानात गेला, असा माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. हा माणूस कोणत्या मातीचा बनला आहे? असा माणूस आमच्या देशात जन्माला यायला हवा होता. त्यांच्या डोळ्यात ना पाणी आहे, ना भीती, दुश्मन देशातही स्वत:च्या घरात वावरल्याप्रमाणे राहतो. अशा माणसाला माझा सलाम. ज्या वाघिणीसारख्या मातेने अशा मुलाला जन्म दिला, तिलाही सलाम”

दुसरीकडे ‘अफगानी भाईजानने’ पाकिस्तानला सल्ला दिला. दुसऱ्या देशांकडून भीक मागून जमवलेले पैसे आत्मघाती हल्लेखोरांवर खर्च करु नका, असं ‘अफगानी भाईजानने’ म्हटलं.

यूट्यूबवर अफगान भाईजान नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर अफगानी नागरिक पाकिस्तानची खिल्ली उडवताना दिसतो. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकवरही अफगानिस्तानी नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. शिवाय इम्रान खान यांना टोमणेही मारले होते.

VIDEO:

इम्रान खानची भारताला धमकी, अफगाणी नागरिकांनी पाकची अब्रू काढली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *