रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या ‘सीक्रेट महाल’चा खुलासा; सरकारविरोधी आंदोलन चिघळलं

या व्हिडीओत नवेलनी पुतिन यांच्या सीक्रेट महालसंदर्भात धक्कादायक खुलासा केलाय

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:50 AM, 28 Jan 2021
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या 'सीक्रेट महाल'चा खुलासा; सरकारविरोधी आंदोलन चिघळलं

मॉस्कोः रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात देशभरात विरोध प्रदर्शन सुरू आहे. विरोधी पक्षाचे नेते एलेक्सी नवेलगीच्या अटकेविरोधात रशियाच्या जवळपास 100 शहरांमधील लोक रस्त्यावर उतरलेत. याचदरम्यान पुतिन यांच्या एक सीक्रेट महालची माहिती समोर आलीय. त्यामुळे प्रदर्शनकारी चांगलेच संतापलेत. खरं तर पुतिन यांचे सर्वात मोठे टीकाकार विरोधी पक्षाचे नेते एलेक्सी नवेलनी यांची अटक 17 जानेवारीला झाली होती. अटकेपूर्वी पहिल्यांदा नवेलनीनं एक व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं होतं, जे त्यांच्या टीमनं सोशल मीडियावर अपलोड केलं. या व्हिडीओत नवेलनी पुतिन यांच्या सीक्रेट महालसंदर्भात धक्कादायक खुलासा केलाय, त्यामुळे प्रदर्शनकारीसुद्धा भडकलेत. (Secret Palace Of Vladimir Putin Claims Alexei Navalny Protest In Russia)

या व्हिडीओत नवेलनी यांनी दावा केला आहे की, रशियाच्या राष्ट्रपतींजवळ 100 अब्ज रुपयांचा सीक्रेट महाल आहे. दक्षिण रशियाच्या जेलेंजिक नावाच्या शहरामध्ये हा महाल असून, काळ्या सागराच्या तटावर तयार करण्यात आलाय. हा महाल जंगलाच्या मधोमध जवळपास 170 एकरांमध्ये पसरलेला आहे. यात हॅलिपॅड, वाइन भंडार, स्पा, कसिनो, सिनेमाघर याशिवाय लग्झरीची प्रत्येक वस्तू आहे, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही.

पुतिन पॅलेस नावानंही तो ओळखला जातो. नवेलनीच्या टीमकडून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये नवेलनीने या पॅलेस चौकशीच्या रिपोर्टसंदर्भात सांगितलंय. तसेच महालमध्ये आइस हॉकीसाठी स्टेडियम आणि चर्चसुद्धा आहे. महलमधून थेट समुद्राच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी सीक्रेट सुरुंगही उपस्थित आहे. ही रशियाची सर्वात मोठी खासगी मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

या महालची किंमत अंदाजे दहा हजार कोटी रुपये

नवेलनीच्या माहितीनुसार, महालच्या आसपास 77 वर्ग किलोमीटरच्या जमिनीवर रशियाच्या गुप्तचर यंत्रणांचा कंट्रोल आहे. हा महाल नो फ्लाय झोनमध्ये आहे. हा महाल एका राज्याच्या अंतर्गत असून, इथे जार यांची सत्ता चालते. या महलातून जमीन, हवा आणि पाण्याद्वारे पोहोचू शकत नाही. महालमध्ये काम करणारा कोणताही कर्मचारी कॅमेरा घेऊन आत जाऊ शकत नाही. ड्रोनच्या माध्यमातून नवेलनीच्या टीमनं महलाचे फुटेज प्राप्त केलेत. नवेलनीच्या माहितीनुसार या महालची किंमत दहा हजार कोटी रुपये आहे. नवेलनी यांनी या समर्थनासाठी अनेक दस्तावेजसुद्धा दिलेत.

ऑगस्ट 2020मध्ये रशियामध्ये नवेलनी यांना विष देण्याचाही प्रयत्न

नवेलनी टीमच्या या माहितीनंतर प्रदर्शनकारी उग्र झाले असून, पुतिन यांच्या ऑफिसनं हा दावा फेटाळून लावलाय. ऑगस्ट 2020मध्ये रशियामध्ये नवेलनी यांना विष देण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर ते जर्मनीला गेले होते. बर्लिनहून मॉस्कोमध्ये दाखल होताच त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. नवेलनीला पॅरोलच्या शर्थी तोडण्यासाठीही दोषी ठरवण्यात आलंय. पुतिन यांनी सत्ता सोडावी, अशी घोषणाबाजीही करण्यात आलीय. रॉयटर्सच्या माहितीनुसार, 40 हजार लोकांनी रॅलीमध्ये भाग घेतलाय. रशियात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करणं ही एक अभूतपूर्व घटना आहे.

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा? सिनेटमध्ये महाभियोग प्रस्तावाचं काय होणार?

व्‍लादीमिर पुतिनचा 100 अब्ज डॉलरचा रहस्‍यमय बंगला, फोटो व्हायरल करणाऱ्याच्या जीवाला धोका का?

Secret Palace Of Vladimir Putin Claims Alexei Navalny Protest In Russia