विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाचा दणका, प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

लंडन : ब्रिटनमधील लंडन हायकोर्टाने कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याला मोठा दणका दिलाय. प्रत्यार्पणाविरोधात त्याने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचं हे मोठं यश मानलं जातंय. भारतीय तपास यंत्रणांकडून विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. विजय मल्ल्यासमोर आता ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग आहे. त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल. …

Vijay Mallya’s extradition plea, विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाचा दणका, प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

लंडन : ब्रिटनमधील लंडन हायकोर्टाने कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याला मोठा दणका दिलाय. प्रत्यार्पणाविरोधात त्याने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचं हे मोठं यश मानलं जातंय. भारतीय तपास यंत्रणांकडून विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

विजय मल्ल्यासमोर आता ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग आहे. त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल. या सर्व प्रक्रियेसाठी आणखी सहा आठवडे लागू शकतात. वेस्टमिन्स्टर कोर्टाने प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर विजय मल्ल्याने हायकोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं होतं. पण हायकोर्टाने याचिकाच फेटाळल्यामुळे मल्ल्याला दणका बसलाय.

मल्ल्याने बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून भारतातून पळ काढला होता. 2016 मध्ये तो इंग्लंडला पळून गेल्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु झाली. मल्ल्यावर जवळपास 31 बँकांचं कर्ज आहे. कोणत्याही परिस्थिती मल्ल्याला भारतात आणलं जाणार आहे. यापूर्वीच ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेलाही मंजुरी दिली होती. मल्ल्यावर भारतातून पळ काढल्यानंतर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांद्वारेच त्याची हजारो कोटी रुपयांची संपत्तीही जप्त करण्यात आली. फसवणूक, पैशांची अफरातफर आणि Foreign Exchange Management Act (FEMA) असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

विजय मल्ल्याला भारतात पाठवण्याची चावी ‘या’ व्यक्तीच्या हातात

विजय मल्ल्‍याला भारतात परत आणण्यातील अडथळे दूर झाल्याचे दिसत आहे. आता यावर ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. याआधी 3 फ्रेब्रुवारी 2019 ला जावेद यांनी या प्रकरणाचा अभ्यास करुन मल्ल्याला भारताकडे सोपवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. मात्र, मल्ल्‍याने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कोण आहेत साजिद जावेद?

विशेष म्हणजे साजिद पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश राजकीय नेते आहेत. ते ब्रिटनमध्ये या स्थानावर पोहचणारे पहिलेच पाकिस्तानी मंत्री ठरले आहे. त्यांचा जन्म 1969 ला ब्रिटेनच्या रोशडेल भागात झला. साजिद यांचे कुटुंब आधी पाकिस्‍तानमध्ये राहायचे. नोकरीच्या शोधात त्यांचे वडील अब्दुल गनी ब्रिटनमध्ये आले होते. त्यांच्या कुटुंबीयांनीही भारत-पाकिस्तान फाळणीच्या संकटला अनुभवले आहे.

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *