सात महिन्यांचा चार्ली महापौरपदी विराजमान

सात महिन्यांचा चार्ली महापौरपदी विराजमान

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये अवघ्या सात महिन्यांच्या विलिअम चार्ल्स चार्ली मॅकमिलिअनला (William Charles “Charlie” McMillian) व्हाईट हॉलचा महापौर बनवण्यात आलं आहे. हा चिमुकला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा महापौर आहे.

Nupur Chilkulwar

|

Dec 18, 2019 | 6:47 PM

टेक्सास : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये अवघ्या सात महिन्यांच्या विलिअम चार्ल्स चार्ली मॅकमिलिअनला (William Charles “Charlie” McMillian) व्हाईट हॉलचा महापौर बनवण्यात आलं आहे. हा चिमुकला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा महापौर आहे. व्हाईट हॉल कम्युनिटी सेंटरमध्ये 150 लोकांच्या समक्ष एका उद्घाटन कार्यक्रमात काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान करुन आलेल्या नवनिर्वाचित महापौर चार्लीने सर्वांचं मन जिंकलं (Youngest Mayor of America).

महापौर चार्लीची निवड ऑक्टोबर महिन्यात झाली होती आणि त्याने या रविवारी ग्राईम्स काउंटीच्या लोकांची सेवा करण्याची शपथ घेतली. चार्लीला दत्तक घेतलेल्या आई-वडील चॅड आणि नॅन्सी मॅकमिलिअनसोबत तो पोडिअमवर शपथ घेण्यासाठी उभा झाला आणि उपस्थित सर्वांनी ‘मेक अमेरिका काईंड अगेन’च्या घोषणा दिल्या.

एक सात महिन्यांचा चिमुकला महापौर कसा होऊ शकतो, हा प्रश्न नक्कीच तुम्हालाही पडला असेल. कारण, ही घटना आश्चर्यकारकच आहे. मात्र, यासाठी तिथल्या निधी गोळा करणाऱ्या एजन्सीने (Fundraiser Agency) मदत केली. Whitehall Volunteer Fire Department BBQ Fundraiser नावाची एजन्सी प्रत्येकवर्षी महापौर पदासाठी बोली लावते. यंदा या सात महिन्यांच्या चार्लीच्या नावावर सर्वात जास्त बोली लागली. त्यामुळे त्याला महापौर बनवण्यात आलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें