AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 भारतीय असलेल्या तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला, ओमानच्या समुद्रात खळबळ, थेट मुंबईच्या एमआरसीसी..

ओमानच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली. थेट एका जहाजावर अमेरिकेने हल्ला केला. या तेलवाहू जहाजावर तब्बल 24 भारतीय नागरिक होते. या हल्ल्याची माहिती तटरक्षक दलाला जहाजावरून देण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाने या 24 भारतीयांना वाचवण्यासाठी पूर्ण कस लावली.

24 भारतीय असलेल्या तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला, ओमानच्या समुद्रात खळबळ, थेट मुंबईच्या एमआरसीसी..
ship
| Updated on: Jun 09, 2026 | 11:39 AM
Share

ओमानच्या आखातात एक धक्कादायक घटना घडली. भारतीय तेलवाहू जहाजावर मोठा मिसाईल हल्ला करण्यात आला. या जहाजावर सर्व भारतीय नागरिक होते. अमेरिकेने ही कारवाई जहाजावर केल्याची माहिती आहे. मोठे मिसाईल जहाजावर टाकले. त्यानंतर या रिकाम्या एमटी मारिव्हेक्स या तेलवाहू जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि त्याला आग लागली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी जहाजावर एकून 24 भारतीय खलाशी होते. त्यांनी जहाजावर हल्ला झाल्यावर तात्काळ थेट भारतीय तटकक्षक दलासोबत संपर्क केला आणि या हल्ल्याची माहिती दिली. एमआरसीसी मुंबई यांनी तात्काळ या हल्ल्याबाबत माहिती ओमानच्या अधिकाऱ्यांना दिली. ओमानच्या अधिकाऱ्यांनी लगेचच मदतकार्य राबवले. मिसाईल हल्ल्यानंतरही जहाजावरील सर्व 24 भारतीय खुलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 8 जून 2026 रोजी दुपारी 2.20 वाजता घडली. एमआरसीसी मुंबई यांना सूचना मिळाली की, पलाऊ ध्वज असलेल्या तेलवाहू जहाज एमटी मारिवेक्स याच्यावर ओमानजवळ हल्ला झाला. जहाजावर 24 लोक होती, सर्वजण भारतीय नागरिक आहेत. ही माहिती मिळताच मुंबई एमआरसीसी यांनी ओमानच्या समुद्री मदत बचावकार्याला संपर्क केला.

त्यानंतर शोध सुरू झाला. मदतकार्याकरिता हेलीकॉप्टर पाठवण्यात आली. सायंकाळी 5 वाजता ओमानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व 24 भारतीयांना सुरक्षित काढले आहे. तोपर्यंत भारतीय एजन्सी सतत ओमानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होत्या. या मोठा हल्ला तेलवाहू जहाजावर करण्यात आला. हे जहाज रिकामे होते. मात्र, हल्ल्यानंतर जहाजाला मोठी आग लागली. इराणच्या बंदराकडे जाण्याचा हे जहाज प्रयत्न करत होते. यादरम्यानच अमेरिकेच्या लष्कराने अमेरिकेची तटबंदी तोडल्याचे सांगत या जहाजावर मोठा हल्ला केला.

यूएस सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांनी वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. हल्ल्यानंतर जहाजाने इराणच्या बंदराकडे जाणे थांबवले. एएनआयच्या सूत्रांनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या हल्ल्याची दखल घेतलेली नाही. 24 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची त्यांनी पुष्टी केली आहे. मात्र, या हल्ल्यानंतर तणाव पुन्हा एकदा वाढस्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!