Snakehead Found In Plane food : विमानातील हवाई सुंदरीच्या जेवणात सापडले सापाचे डोके

तुर्की येथील सनएक्सप्रेस एअरलाईन्सच्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सनएक्सप्रेस एअरलाईन्सच्या विमानात दिल्या जाणाऱ्या जेवणात चक्क सापाचे डोके सापडल्याने खळबळ उडाली आहे. विमानातील हवाई सुंदरीच्याच जेवणात हे सापाचे डोके आढळून आले. या हवाई सुंदरीने याबाबत तक्रार केली आहे. हवाई सुंदरीच्या तक्रारीनंतर एअरलाईन्सने जेवण पुरवणाऱ्या कंपनीसोबतचा करारच रद्द केला आहे.

Snakehead Found In Plane food : विमानातील हवाई सुंदरीच्या जेवणात सापडले सापाचे डोके
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:38 PM

दिल्ली : सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात तसेच अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या जेवणात झुरळ यासारखे कीटक सापडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता मात्र चक्क विमानातील जेवणात सापाचे डोकं(Snake head) सापडले आहे. विशेष म्हणजे एका हवाई सुंदरीच्या प्लेट मधील जेवणातच हे सापाचं डोकं आढळले आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. तुर्कीतील(Turkey) एका एअरलाइन्स कंपनीच्या विमानात हा प्रकार घडला आहे. याबाबत हवाई सुंदरीने मॅनेजमेंटकडे तक्रार केली आहे.

तुर्की येथील सनएक्सप्रेस एअरलाईन्सच्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सनएक्सप्रेस एअरलाईन्सच्या विमानात दिल्या जाणाऱ्या जेवणात चक्क सापाचे डोके सापडल्याने खळबळ उडाली आहे. विमानातील हवाई सुंदरीच्याच जेवणात हे सापाचे डोके आढळून आले. या हवाई सुंदरीने याबाबत तक्रार केली आहे. हवाई सुंदरीच्या तक्रारीनंतर एअरलाईन्सने जेवण पुरवणाऱ्या कंपनीसोबतचा करारच रद्द केला आहे.

सॅलेडमध्ये सापाचे डोकं पाहून ही हवाई सुदंरी खूपच भयभित झाली

सनएक्सप्रेस कंपनीचे हे विमान तुर्कीतील अंकारा येथून जर्मनीच्या डस्सलडोर्फ येथे जात होते. 21 जुलैला सर्व प्रवाशांना जेवण दिल्यानंतर विमानातील हवाई सुंदरी देखील जेवत होत्या. यातील एका हवाई सुंदरीने व्हेज जेवण जेवत होती. त्यावेळी तिच्या जेवणातील सलाडमध्ये चक्क सापाचे डोके तिला दिसले. सॅलेडमध्ये सापाचे डोकं पाहून ही हवाई सुदंरी खूपच भयभित झाली. तिने याविषयी सहकाऱ्यांना सांगितले असता त्यांना ती मस्करी करत असल्याचे वाटले. मात्र जेव्हा तिने तिच्या प्लेटमधील सलाड दाखवले तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

यानंतर सर्व क्रू मेंबरने मॅनेजमेंटकडे तक्रार केली. प्रवाशांची सुरक्षा हे आमचे मुख्य ध्येय आहे. अशा प्रकारे जेवणात काहीही आढळून येणे अक्षम्य आहे. त्यामुळे आम्ही जेवण पुरवणाऱ्या कंपनीशी करार मोडला आहे. विमानात प्रवाशांना व आमच्या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची आम्ही पुरेपुर काळजी घेतो असे सनएक्सप्रेस एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.

परभणीत अंगणवाडीतील पोषण आहारात निघाल्या अळ्या आणि किडे

लहान मुलांना अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि किडे निघाल्याची संताप जनक घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा या गावात घडली आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. पोषण आहारामध्ये अळ्या असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हा पोषण आहार फेकून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही बालकांनी हा पोषण आहार खाल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहे. दरम्यान , या संपूर्ण प्रकाराची तक्रार गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. जिल्हाधिकारी या गंभीर प्रकरणात काय कारवाई करतात हेच पाहणे आता महत्त्वाचचे ठरणार आहे .

Non Stop LIVE Update
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.