महात्मा गांधींचे पणतू सतीश धुपेलिया कालवश, कोरोना संसर्गानंतर अखेरचा श्वास

सतीश धुपेलिया हे महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केलेले पुत्र मणिलाल गांधी यांचे वंशज होते

महात्मा गांधींचे पणतू सतीश धुपेलिया कालवश, कोरोना संसर्गानंतर अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 11:32 AM

जोहान्सबर्ग : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा वारसा दक्षि आफ्रिकेत चालवणारे पणतू सतीश धुपेलिया (Satish Dhupelia) यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. जोहान्सबर्गमध्ये रविवारी संध्याकाळी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वाढदिवसानंतर अवघ्या तीन दिवसात धुपेलिया यांची प्राणज्योत मालवली. (South African great-grandson of Mahatma Gandhi Satish Dhupelia succumbs to COVID-19)

“माझे बंधू सतीश धुपेलिया यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून निमोनियाचे उपचार सुरु होते. रुग्णालयात कोरोना संसर्गानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. रविवारी संध्याकाळी त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आला” अशी माहिती त्यांची बहीण उमा धुपालिया-मेस्त्री (Uma Dhupelia Mesthrie) यांनी दिली.

कोण होते सतीश धुपेलिया?

सतीश धुपेलिया यांनी फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील मीडियामध्ये केलेले काम गाजले आहे. गांधी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कामात त्यांनी मोठे सहाय्य केले होते. डर्बनमध्ये महात्मा गांधींनी हे कार्य सुरु केले होते. धुपेलिया हे 1860 मध्ये स्थापन झालेल्या हेरिटेज फाऊंडेशनच्या मंडळाचे सदस्यही होते.

सर्व समाजातील गरजूंना मदत करण्याबद्दल सतीश धुपेलिया यांची ख्याती होती. ते बर्‍याच समाज कल्याण संघटनांमध्ये कार्यरत होते. धुपेलियांच्या निधनाचा धक्का बसल्याने निकटवर्तीयांनी शोक व्यक्त केला आहे.

सतीश धुपेलिया, उमा धुपालिया-मेस्त्री आणि कीर्ती मेनन ही तिघं भावंडं. कीर्ती मेनन या जोहान्सबर्गला स्थायिक असून महात्मा गांधी यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या प्रकल्पांचा त्या भाग आहेत.

धुपेलिया भावंडं ही मणिलाल गांधी यांचे वंशज. दक्षिण आफ्रिकेत दोन दशकं घालवल्यानंतर भारतात परतताना आपलं काम पुढे चालू ठेवण्यासाठी महात्मा गांधी यांनी मणिलाल गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतच राहण्यास सांगितले होते.

हेही वाचा :

गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण अंगिकारलं, तर अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील : राज ठाकरे

गांधींजींचा देशातील सर्वात उंच पुतळा महाराष्ट्रात, 35 टन भंगार वापरुन निर्मिती

(South African great-grandson of Mahatma Gandhi Satish Dhupelia succumbs to COVID-19)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.