‘एफ1’ कारच्या थरारक अपघाताचा व्हिडीओ

'एफ1' कारच्या थरारक अपघाताचा व्हिडीओ

अबुधाबी : टीव्हीवर तुम्ही अनेक गाड्यांच्या रेसिंग स्पर्धा पाहिल्या असतील. त्यातील होणारे अपघात अंगावर शहारे आणणारे असतात. एफ1 गाड्यांची रेसिंग म्हटली तर अपघाताचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. या गाड्यांच्या रेसमध्ये आतापर्यंत अनेक अपघात झालेल्या व्हिडीओ तुम्ही पाहिल्या असतील. अशीच श्वास रोखून धरायला लावणारी व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हा अपघात झाला आहे. अबु धाबी येथे झालेल्या एफ 1 गाड्यांच्या रेसिंग स्पर्धेत हा भयानक अपघात झाला आहे. रेसिंग चालू असताना निको हुल्कबर्ग आणि रोमेन ग्रोसजीन या दोघांच्या गाडीत टक्कर झाली. एकमेकांना घासल्यामुळे निकोची गाडी उडाली आणि रोडच्या कोपऱ्यात जाऊन आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की पाहणारे प्रत्येकजण घाबरून गेले. गाडीता अपघात झाल्यावर तीन मिनिटे ती जळत होती पण तातडीने निकोची टीम आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. निकोला बाहेर काढताच तो मी ठीक आहे असे त्याने त्याच्या टीमला सांगितले.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI