कुत्र्याने तब्बल 14,500 रुपयांच्या नोटा खाल्ल्या, उपचाराला त्यापेक्षा जास्त खर्च

लंडन : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचा कोणताही अंदाज लावणे तसे कठीण आहे. सध्या असाच एक वेगळा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे तब्बल 14,500 रुपये किमतीच्या नोटा खाणाऱ्या कुत्र्याचा. या फोटोत लॅब्राडोर जातीचा कुत्रा दिसत आहे. तसेच त्याच्या शेजारीच त्याने खाल्लेल्या नोटाही दिसत आहेत. या कुत्र्याने आपल्या मालकाच्या जवळजवळ 14,500 रुपये किमतीच्या …

Dog eat currency, कुत्र्याने तब्बल 14,500 रुपयांच्या नोटा खाल्ल्या, उपचाराला त्यापेक्षा जास्त खर्च

लंडन : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचा कोणताही अंदाज लावणे तसे कठीण आहे. सध्या असाच एक वेगळा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे तब्बल 14,500 रुपये किमतीच्या नोटा खाणाऱ्या कुत्र्याचा.

या फोटोत लॅब्राडोर जातीचा कुत्रा दिसत आहे. तसेच त्याच्या शेजारीच त्याने खाल्लेल्या नोटाही दिसत आहेत. या कुत्र्याने आपल्या मालकाच्या जवळजवळ 14,500 रुपये किमतीच्या (160 पाउंड) नोटांनाच आपले जेवण बनवत फस्त केले.

ही घटना ब्रिटनमधील नॅार्थ वेल्स भागातील आहे. या ठिकाणी संबंधित कुत्रा भुकेने एवढा व्याकुळ झाला, की त्याने खायला दुसरं काही भेटलं नाही म्हणून लेटरबॉक्समधली एक लिफाफाच खाल्ला. या लिफाफ्यात मालकाचे पैसे होते आणि कुत्र्याने या पैशांसह लिफाफा फस्त केला.

यानंतर मालकाने कुत्र्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केला आणि उल्टी करायला लावत डॉक्टरांनी कुत्र्याच्या पोटातील नोटा बाहेर काढल्या. गंमत म्हणजे कुत्र्याने खाल्लेल्या या नोटा बाहेर काढण्यासाठी तब्बल 11,846 रुपये (130 पाउंड) खर्च आला. त्यामुळे कुत्र्याच्या मालकाला नक्कीच डोक्याला हात लावण्याची वेळ आली असणार यात शंका नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *