हे पहिल्यांदा घडतंय : लॉकडाऊनमध्ये अधीर झालेल्या आजी-नातवंडांची अनोखी भेट, दारावरील प्लास्टिकच्या पडद्यातून मिठी

लॉकडाऊनच्या काळात आपल्या नातवांना भेटण्यासाठी अधीर झालेल्या आजीची इच्छा पूर्ण झाली. अनोखी शक्कल लढवून आजीनं आपल्या नातवांना मिठी मारली.

हे पहिल्यांदा घडतंय : लॉकडाऊनमध्ये अधीर झालेल्या आजी-नातवंडांची अनोखी भेट, दारावरील प्लास्टिकच्या पडद्यातून मिठी

मुंबई : जगभरासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे (Things Happening First Time). जगात सध्या कोरोनाचे 46 लाख 83 हजार 646 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जगात 3 लाख 10 हजार 825 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर देशात सध्या कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 940 च्या पार पोहोचला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात अनेक गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. त्याचा हा आढावा (Things Happening First Time)

1. जगभरातल्या कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबतीत धाकधूक असताना एशियन पेन्ट्स या कंपनीने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना घशघशीत वाढ देण्याचा निर्णय घेतला. कंपनीनं घेतलेल्या या निर्णयाचं कर्मचाऱ्यांकडून स्वागत आणि तोंडभरुन कौतुक केलं जातं आहे. एशियन पेन्ट्स ही रंग बनवणारी भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी पीएम केअर्स आणि मुख्यमंत्री निधीत कंपनीनं 35 कोटी रुपये सुद्धा दिले आहेत. इतकंच नाही, तर सॅनिटायझरची मागणी लक्षात घेत एशियन पेन्स्ट्सने काही आपल्या काही प्रकल्पांमध्ये सॅनिटायझरची निर्मीती सुद्धा सुरु केली.

2. पत्नीच्या चारित्र्यावर संशय बळावल्याने एक व्यक्ती क्वारंटाईन सेंटरमधून पळून गेला. छत्तीसगडच्या जाशपूर जिल्ह्यात ही घटना घडली. लोकसत्ताच्या बातमीनुसार दुसऱ्या राज्यातून आलेमुळे संबंधित व्यक्तीला शासकीय इमारतीत क्वारंटाईन करण्यात आलं. मात्र, पत्नीला फोन केल्यावर तिचा फोन वारंवार बिझी यायचा. त्याच रागातून छतावरुन उडी मारुन व्यक्तीनं थेट घर गाठलं. जेव्हा हा व्यक्ती घरी पोहोचला, तेव्हा सुद्धा पत्नी इतर कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचं पाहून त्यानं पत्नीवर हल्ला केला. सध्या पतीला ताब्यात घेण्यात आलं आणि पत्नीवर उपचार सुरु आहेत.

3. लॉकडाऊन हटवल्यानंतरही पुढचा काही काळ जर मुंबईतले रेड लाईटची ठिकाणं बंद ठेवली, तर कोरोनाच्या 21 टक्के रुग्ण टाळता येऊ शकतात, असा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. फक्त मुंबईतच नव्हे जर देशभर या निर्णयाची अंमलबजावणी केली, तर 45 दिवसात कोरोनाच्या केसेस 72 टक्‍क्‍यांनी घटू शकण्याचाही अंदाज आहे. वॉशिंग्‍टनमधल्या येल स्‍कूल ऑफ मेडिसीन आणि हार्वर्ड मेडिकल स्‍कूलच्या शिक्षणतज्ञांना हा अभ्यास मांडला.

4. पुढच्या काही महिन्यात जगभरात 12 लाख बालकांचा मृत्यू होऊ शकतो, असा धक्कादायक अंदाज युनिसेफने वर्तवला आहे. महत्वाचं म्हणजे बालकांचे मृत्यू हे कोरोनामुळे नव्हे, तर कोरोनामुळे आरोग्य सेवेचा अभाव आणि इतर आजार या दोन कारणांमुळे होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, आरोग्य यंत्रणेसाठीचे मनुष्यबळ आणि आवश्यक उपकरणे या सर्व गोष्टींवर भारतासहित अनेक देशांना भर द्यावा लागणार आहे.

5. भारताने कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत चीनला थेट अडीच हजार रुग्णांच्या फरकाने मागे टाकलं आहे. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत चीन आता 13 व्या स्थानी आहे. तर भारत 11 व्या स्थानावरपुढे सरकला आहे. महत्वाचे म्हणजे चीन 12 व्या स्थानी जाईल, अशी आशा होती. मात्र, भारताबरोबरच पेरु या देशातही मोठ्या संख्येनं रुग्ण वाढल्यामुळे पेरु भारतानंतर म्हणजे 12 व्या स्थानी राहिलाय. दरम्यान, पहिल्या पाच देशांमध्ये अमेरिका सोडला. तर अजूनही युरोपियन देशच कोरोनारुग्णांच्या बाबतीत पुढे आहेत (Things Happening First Time).

6. जागतिक कोरोनग्रस्तांच्या आकडेवारीत भारत 11 व्या स्थानी गेला असला तरी आशिया खंडात मात्र भारतानं तिसऱ्या स्थानी झेप घेतली. तुर्की आणि इराण हे दोनच देश भारताच्या पुढे आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. मात्र, तुर्की आणि इराण या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतातल्या रुग्णसंख्येत 30 हजारांहून जास्तीचं अंतर आहे. दरम्यान, आशिया खंडातल्या कोरोना यादीत चौथ्या क्रमांकावर चीन तर सहाव्या क्रमाकांवर पाकिस्तान आहे.

7. अमेरिकेत काही लोक कोरोनावर सुरु असलेल्या लसीच्या संशोधनाला विरोध सुद्धा करत आहेत. त्यांच्या मते कोरोनाची लस ही माणसांसाठी अपायकारक ठरु शकते. लसी ऐवजी कोरोनाविरोधात ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कोरोनाबाधित करा. असा पर्याय त्यांनी ठेवला. मात्र, त्या प्रक्रियेला अनेक वर्ष लागण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, कोरोना लस ही प्रत्येकाला बंधनकारक नसावी यासाठी अमेरिकेत एक याचिका सुद्धा दाखल झाली. त्यावर 3 लाखांहून जास्त लोकांनी सह्या सुद्धा केल्या आहेत.

8. वेनेझुएलामध्ये लॉकडाऊन असलं तरी अनेक लोकांनी आता गच्चीवरच पार्टी करणं सुरु केलं. गच्चीवरुनच लोक एकमेकांना चीअर्स करत आहेत. त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पार्टीबरोबरच गच्चीवर म्युझिक शो आणि ऑर्केस्ट्राचंही आयोजन केलं जातं.

9. लॉकडाऊनच्या काळात आपल्या नातवांना भेटण्यासाठी अधीर झालेल्या आजीची इच्छा पूर्ण झाली. अनोखी शक्कल लढवून आजीनं आपल्या नातवांना मिठी मारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. दारावर प्लॅस्टिकच्या सीटचा एक पडदा तयार केला गेला. ही आयडिया या कुटुंबाला इंटरनेटवरुन मिळाली होती. हा व्हिडीओ कॅलिफोर्नियाचा असल्याची माहिती आहे.

10. माकडांवर यशस्वी चाचणी केल्यानंतर आता ऑक्सफर्ड माणसांवर चाचणीसाठी सज्ज झाली. त्याची संपूर्ण माहिती पहिल्यांदाच जारी करण्यात आली. एकूण 3 टप्प्या माणसांवर चाचण्या होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1 हजार लोकांवर चाचण्या होणार आहेत. ज्याचा परिणाम त्याच महिन्यात येण्याची आशा आहे. नुकतीच 6 माकडांवरचाचणी केली गेली आणि काही दिवसातच त्या सहा माकडाच्या शरिरात अँटीबऑडी विकसीत झाल्या आहेत. ऑक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रूप आणि जेनर इन्स्टिट्यूट संयुक्तरीत्या कोरोनाविरोधी लसीचं संशोधन करत आहेत. यात जगातील सर्वात मोठी लस उत्पादक असलेली भारताची सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सुद्धा (Things Happening First Time) सहभागी आहे.

संबंधित बातम्या :

मोदी माझे चांगले मित्र, भारत-अमेरिका लस विकसित करणार, व्हेंटिलेटरही पाठवणार : डोनाल्ड ट्रम्प

हे पहिल्यांदा घडतंय : इंडोनेशियात सोशल डिस्टसिंगचं उल्लंघन केल्यास शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत 12 व्या स्थानी, चीननंतर भारताचा क्रमांक

कोरोना कदाचित कधीच नष्ट होणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *