पाकिस्तानात सोने 86 हजारांवर, टोमॅटोचा दर तब्बल......

पाकिस्तानात सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ (Pakistan tomato price hike) झाली आहे.

पाकिस्तानात सोने 86 हजारांवर, टोमॅटोचा दर तब्बल......

इस्लामाबाद : पाकिस्तानात सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ (Pakistan tomato price hike) झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील जनतेसमोर मोठं संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानमध्ये आता टोमॅटोच्या किंमतीतही वाढ (Pakistan tomato price hike) झाली आहे. पाकिस्तानात टोमॅटो तब्बल 400 रुपये प्रति किलो विकला गेला आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे तेथील जनता त्रस्त आहे.

पाकिस्तानमधील टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे तेथील सरकारने परिस्थिती सांभाळण्यासाठी थेट इराणवरुन टोमॅटोची आयात केली आहे. पण इराणी टोमॅटो बाजारात पोहोचले नसल्याने अजूनही येथील टोमॅटोच्या किंमतीत घट झाली नाही.

कराचीमध्ये सोमवारी (19 नोव्हेंबर) टोमॅटो 300 रुपये प्रति किलो विकला गेला. मंगळवारी (20 नोव्हेंबर) या किंमतीत वाढ होऊन 400 रुपये झाली आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या वृत्तपत्राने दिली.

“सरकारने इराणवरुन साडेचार हजार टन टोमॅटो आयात करण्याचा परमिट जारी केला होता. पण आतापर्यंत 989 टन टोमॅटो पाकिस्तानत पोहचू शकला आहे”, असं एका व्यापाऱ्याने सांगितले.

“सरकारने खुल्या बाजारातील नियमांचे पालन न करता त्यांनी थेट काही व्यापाऱ्यांना इराणवरुन टोमॅटो आयात करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आणलेले टोमॅटो सीमाभागात विकले गेले. खुल्याबाजाराप्रमाणे जर टोमॅटोची आयात झाली असती तर आता परिस्थितीमध्ये सुधार झाली असती”, असं काही भाजी विक्रेत्या संघटनानी सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानात टोमॅटो महागला असताना भारतात मात्र कांद्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे येथील जनता त्रस्त आहे. भारतात कांद्याचे भाव 90 ते 100 रुपयापर्यंत पोहोचले आहे.

पाकिस्तानात मटणाचे दर 1000 ते 1200 रुपये प्रति किलो

पाकिस्तानात दररोजच्या वस्तूंमध्ये वाढ होत असतानाचा भाजी-पाल्यांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे तेथील लोकांनी खायचे काय असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे. पाकिस्तानात मटणाचे दर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मटणाचे वाढलेले दर पाहून धक्का बसला आहे.

पाकिस्तानात सोन्याचा दर प्रति तोळा 86 हजार 200 रुपये

पाकिस्तानात सोन्याचा भावही गगनाला भिडला आहे. येथे सोने प्रति तोळा 86 हजार 200 रुपयाने विकला जात आहे. भारतात सध्या सोन्याचा भाव 39 हजार आहे. पण त्याहून दुप्पट भाव पाकिस्तानात सुरु आहे, अशी माहिती तेथील वृत्तसंस्थेने दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *