PM मोदी UAE मधून भारतात यायला निघाले; यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद स्वत: विमानतळावर सोडायला आले

पंतप्रधान मोदींनी यूएईचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल वैयक्तिक शोक व्यक्त केला. अबुधाबीला पोहोचल्यानंतर पीएम मोदी आणि यूएईच्या राष्ट्राध्यक्षांची बैठक झाली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी यूएईचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल वैयक्तिक शोक व्यक्त केला.

PM मोदी UAE मधून भारतात यायला निघाले; यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद स्वत: विमानतळावर सोडायला आले
वनिता कांबळे

|

Jun 28, 2022 | 8:28 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi ) दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यानंतर मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीत(UAE) दाखल झाले, तेथून ते आता भारताकडे रवाना झाले आहेत. अबुधाबी येथे त्यांचे आगमन झाल्यावर यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान(UAE President Sheikh Mohammed) यांनी त्यांचे स्वागत केले. यादरम्यान अध्यक्ष शेख देखील पीएम मोदींना मिठी मारताना दिसले.पीएम मोदी यूएईचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी UAE मध्ये गेले होते. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे १३ मे रोजी दीर्घ आजारामुळे  निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. नाह्यान 2004 पासून सत्तेत होते.

पंतप्रधान मोदींनी यूएईचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल वैयक्तिक शोक व्यक्त केला. अबुधाबीला पोहोचल्यानंतर पीएम मोदी आणि यूएईच्या राष्ट्राध्यक्षांची बैठक झाली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी यूएईचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल वैयक्तिक शोक व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी शेख खलिफा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांचे वर्णन एक महान राजकारणी आणि दूरदर्शी नेता असे  केले. ज्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधील संबंध समृद्ध झाले. शेख खलिफा यांच्या निधनानंतर भारतानेही एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता.

जर्मनीतील G-7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान UAE ला गेले होते. पीएम मोदींनी जर्मनीतील शिखर परिषदेदरम्यान जगातील अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि जागतिक कल्याण आणि समृद्धी वाढवण्याच्या उद्देशाने विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें