लादेनच्या मुलावर अमेरिकेचं इनाम, हमजा लादेन बदला घेण्याच्या तयारीत

न्यूयॉर्क: अल कायदा या दहशतवादी संघटेनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर, आता अमेरिकेने आपला मोर्चा त्याच्या मुलाकडे वळवला आहे. लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने 10 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 7 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. हमजा बिन लादेन आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी कोणत्यातरी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेने केला […]

लादेनच्या मुलावर अमेरिकेचं इनाम, हमजा लादेन बदला घेण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

न्यूयॉर्क: अल कायदा या दहशतवादी संघटेनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर, आता अमेरिकेने आपला मोर्चा त्याच्या मुलाकडे वळवला आहे. लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने 10 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 7 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. हमजा बिन लादेन आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी कोणत्यातरी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. त्यामुळे अमेरिकेने इतक्या मोठ्या रकमेचं इनाम जाहीर केलं आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी बक्षिसाची घोषणा केली. हमजा आणि त्याचे साथीदार मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. सुरक्षा यंत्रणांकडून याबाबतची माहिती मिळाल्यानंतरच याबाबतची घोषणा अमेरिकेने केली.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी एम टी इवानोव यांच्या मते, दहशतवाद आणि निष्पक्षतेविरोधात अमेरिकेची लढाई कायम असेल.

दुसरे अधिकारी नाथन सेल्सब यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अल कायदा गेल्या अनेक काळापासून शांत आहे. मात्र ही शांतता त्यांची एक रणनीती आहे. अल कायदा अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अल कायदा या संघटनेत हमजाला मोठं पद मिळालं आहे”.

लादेनचा खात्मा

अमेरिकेने 2011 मध्ये अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील एबटाबादमध्ये घुसून ठार केलं होतं. लादेनने अमेरिकेत 9/11 ला हल्ला केला होता, यामध्ये जवळपास 3 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.

हमजा लादेन

दरम्यान, लादेनचा मुलगा हमजाने काही दिवसांपूर्वीच लग्न केलं. 9/11 दहशतवादी हल्ल्यात विमान हायजॅक करणाऱ्या मोहम्मद अट्टाच्या मुलीशी हमजाने निकाह केला. ओसामाच्या सावत्र भावांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या लग्नाचा उल्लेख आहे. या बातमीनुसार, हमजाच्या पत्नीकडे इजिप्तचं नागरिकत्व आहे.

लादेनच्या खात्म्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुली सौदी अरेबियाला गेले होते. तिथे माजी युवराज मोहम्मद बिन नायेफने आश्रय दिला होता. ओसामाच्या पत्नी आणि मुलांनी सातत्याने लादेनची आई आलिया घानेमशी संपर्क ठेवून होत्या.

VIDEO:

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.