डोनाल्ड ट्रम्प झाले दहाव्यांदा आजोबा!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दहाव्यांदा आजोबा झाले आहेत. ट्रम्प यांना पाच मुलं असून त्यांचा तिसरा मुलगा दुसऱ्यांदा बाबा झाला.

डोनाल्ड ट्रम्प झाले दहाव्यांदा आजोबा!

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donlad Trump) पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. ट्रम्प आजोबांना दहा नातवंडं खेळवण्याचं भाग्य लाभलं आहे. डोनाल्ड यांचे पुत्र एरिकची पत्नी लारा हिने सोमवारी मुलीला जन्म दिला.

बाबा झाल्याचं वृत्त ट्रम्प यांचा 35 वर्षांचा मुलगा एरिकने लगेच ट्विटरवरुन शेअर केलं होतं. ‘लारा ली ट्रम्प आणि मी कॅरोलिना डोरोथी ट्रम्पचं स्वागत करत आहोत. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ असं ट्वीट त्याने केलं होतं. हे एरिक आणि लारा यांचं दुसरं अपत्य आहे. त्यांचा मोठा मुलगा एरिक ल्युक ट्रम्प सप्टेंबर महिन्यात दोन वर्षांचा होईल.

73 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन महिलांपासून पाच अपत्य आहेत. इवाना यांच्यासोबत डोनाल्ड यांचा विवाह 1977 मध्ये झाला होता. त्यांना डोनाल्ड ज्युनिअर, इवांका आणि एरिक ही तीन मुलं. 15 वर्षांच्या सहजीवनानंतर 1992 मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि इवाना विभक्त झाले.

डोनाल्ड ज्युनिअरला पाच, तर इवांका ट्रम्पला तीन मुलं आहेत. एरिक आता दुसऱ्यांदा पिता झाला. एरिक आणि डोनाल्ड ज्युनिअर हे ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’मध्ये सिनिअर एक्झिक्युटिव्ह आहेत.

1993 मध्ये डोनाल्ड यांनी मार्ला मेपल्ससोबत लगीनगाठ बांधली. टिफनी ही डोनाल्ड आणि मार्ला यांची कन्या. मात्र सहा वर्षांतच म्हणजे 1999 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

2005 मध्ये डोनाल्ड यांचं तिसरं लग्न झालं. स्लोवेनियन-अमेरिकन फॅशन मॉडेल मेलानियासोबत ते बोहल्यावर चढले. दोघांना बॅरन हा 13 वर्षांचा मुलगा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *