VIDEO : थायलंडच्या समुद्रात तब्बल चार चक्रीवादळं, लाटांचा थरार

  • Sachin Patil
  • Published On - 20:20 PM, 27 Nov 2018
VIDEO : थायलंडच्या समुद्रात तब्बल चार चक्रीवादळं, लाटांचा थरार

बँककॉक : थायलंडमध्ये समुद्रात चक्रीवादळामुळे एकच खळबळ उडाली. समुद्रात एक-दोन नव्हे, तब्बल चार चक्रीवादळं आली. त्यामुळे किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालं होतं. ही घटना सोमवारी थायलंड येथील एका समुद्रकिनाऱ्यावर घडली.

या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. व्हिडीओ पाहताच मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. एकाचवेळी चार चक्रीवादळ समुद्रात दिसल्याने किनाऱ्यावरील सर्वच पर्यटक आश्चर्यचकीत झाले आहेत. याआधी कधीही असे चक्रीवादळ आम्ही पाहिले नव्हते अशी प्रतिक्रिया उपस्थित पर्यटाकांनी दिली.

किम पुयू नावाच्या व्यक्तिने ही घटना आपल्या कॅमेरात कैद केली आहे. किम हा थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर काम करतो. चक्रीवादळ येण्याआधी येथील वातावरण गरम होते, सूर्यही तापलेला होता, पण अचानक वातावरण ढगाळ झाले आणि समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असे किमने सांगितले.