VIDEO : ट्रेनसारखं विमानही धावत-धावत पकडण्याचा महिलेचा प्रयत्न

इंडोनेशिया : आपण बस, ट्रेन धावून पकडली असणार, पण काय तुम्ही कधी धावत धावत विमान पकडण्याचा प्रयत्न केलाय? आता तुम्ही म्हणाल की, धावत धावत विमान कसं पकडणार? एका महिलेने मात्र असे प्रयत्न केले, तिने विमानामागे धावून विमान पकडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. हे प्रकरण इंडोनेशिया येथील आहे. येथील …

VIDEO : ट्रेनसारखं विमानही धावत-धावत पकडण्याचा महिलेचा प्रयत्न

इंडोनेशिया : आपण बस, ट्रेन धावून पकडली असणार, पण काय तुम्ही कधी धावत धावत विमान पकडण्याचा प्रयत्न केलाय? आता तुम्ही म्हणाल की, धावत धावत विमान कसं पकडणार? एका महिलेने मात्र असे प्रयत्न केले, तिने विमानामागे धावून विमान पकडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. हे प्रकरण इंडोनेशिया येथील आहे. येथील बाली विमानतळावर एका महिलेचा विमान सुटला. ज्यानंतर तिने रनवेवर त्या विमानामागे धावत तो पकडण्याचा प्रयत्न केला. हा विचित्र कारनामा करण्याऱ्या महिलेचं नाव हाना आहे.


या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ही महिला रनवेवर त्या विमानामागे जाण्याचा प्रयत्न करते आहे. तिला दोन सिक्योरिटी अधिकाऱ्यांनी पकडून ठेवलं आहे, तरी ती विमानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते.

विमानतळ प्रवक्तांनी सांगितले की, ही महिला विमानतळावर बोर्डिंगसाठी पोहोचली नव्हती. तेव्हा तिला तीनवेळा कॉल करण्यात आला. पण तिने फोन उचलला नाही. विमान टेक ऑफ करण्याच्या 10 मिनिटांआधी ही महिला सिक्योरिटी तोडत बोर्डिमग गेट पार करत विमानाच्या दिशेने पळायला लागली.

अशाप्रकारे टोक ऑफ घेत असलेल्या विमानाचा पाठलाग करणऱ्या महिलेला बघून सर्वच आश्चर्यचकीत झाले. सिक्योरिटीने तिला थांबवायचे प्रयत्न केले, पण ती कुणालाही न जुमानता विमान पकडण्यासाठी पळाली. अखेर दोन सिक्योरिटी अधिकाऱ्यांनी तिला पकडले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *